Lakhimpur Kheri Violence: यूपी पोलिसांकडून दोघांना अटक  Saam Tv
देश विदेश

Lakhimpur Kheri Violence: यूपी पोलिसांकडून दोघांना अटक

लखीमपूर खेरीत घडलेल्या हिंसाचार प्रकरणी दोघांना अटक करण्यात आल्याचं वृत्त समोर येत आहे.

विहंग ठाकूर

विहंग ठाकूर

लखीमपूर : लखीमपूर खेरीत घडलेल्या हिंसाचार प्रकरणी दोघांना अटक करण्यात आल्याचं वृत्त समोर येत आहे. वृत्तसंस्थेनुसार, या प्रकरणी दोन व्यक्तींना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तर अटक करण्यात आलेल्यांची नावे लवकुश राणा आणि आशिष पांडे अशी आहेत.

लखीमपूर येथे भाजपच्या BJP वतीने त्या ठिकाणी एक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तेथील काही शेतकरी भाजपच्या नेत्यांचा विरोध करण्यासाठी काळे झेंडे घेऊन लखीमपूर खेरी येथे जमले होते. मात्र शेकऱ्यांवर गाडी घालून त्यांना चिरडण्याचा प्रकार या ठिकाणी घडला होता. या दुष्कृत्याचा व्हिडीओ फार मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

तसेच झालेल्या या प्रकरणामुळे योगी सरकारवर टीका करण्यात येत आहे. या संपूर्ण प्रकरणात चार (4) शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. तसेच यानंतर झालेल्या हिंसाचारात आणखी चार सरकारी कर्मचारी मृत पावले होते. तसेच एका पत्रकाराचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले होते.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

डोंबिवलीत भाजप अन् मनसेत 'डिजिटल युद्ध'! एआय व्यंगचित्रं आणि मीम्सच्या माध्यमातून थेट नेत्यांवर निशाणा

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! एकाचवेळी खात्यात येणार ₹4,000? जाणून घ्या सत्य

Pitod Recipe : भाजी संपलीय? मग झटपट बनवा खमंग 'पितोड', चवीला लागेल भन्नाट

Political News: मोठी बातमी! 'त्या' २० बंडखोर खासदारांना झटका, सुप्रीम कोर्टाने बजवली नोटीस

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

SCROLL FOR NEXT