BJP leaders pay tribute to veteran leader Lajja Rani Garg saam tv
देश विदेश

भाजप महिला मोर्चाच्या माजी प्रदेशाध्यक्षांचं निधन, राजकारणात शोककळा, मंत्री, आमदार निवासस्थानी दाखल

Former BJP Mahila Morcha State President Lajja Rani Garg Dies In Pilkhuwa: उत्तर प्रदेशातील हापूरच्या पिलखुवा येथील भाजपच्या ज्येष्ठ नेत्या लज्जा राणी गर्ग यांचे मंगळवारी रात्री निधन झाले. त्यांच्या निधनानंतर भाजप नेते आणि कार्यकर्त्यांनी श्रद्धांजली वाहत शोक व्यक्त केला.

Omkar Sonawane

उत्तरप्रदेश: हापूरच्या पिलखुवा येथील भाजपच्या ज्येष्ठ नेत्या लज्जा गर्ग यांचे मंगळवारी रात्री निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी समजताच भाजपमध्ये शोककळा पसरली. मोठ्या संख्येने नागरिक रुग्णालय तसेच गांधी रोडवरील त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले. यावेळी त्यांच्या पार्थिवावर पुष्प अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली.

भाजपमध्ये अनेक महत्वाच्या पदांवर जबाबदारी

लज्जा राणी गर्ग या अनेकवर्ष भाजप संघटनेत सक्रिय होत्या, त्यांनी महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रीय सचिव, प्रदेश उपाध्यक्ष आणि क्षेत्रीय अध्यक्ष यांसह पक्षातील अनेक महत्वाच्या पदांची जबाबदारी सांभाळली होती. तसेच त्या भाजपच्या राष्ट्रीय परिषद आणि प्रदेश कार्यसमितीच्या सदस्यही राहिल्या होत्या. संघटनेत दीर्घकाळ सक्रिय राहिल्याने कार्यकर्त्यांमध्ये त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली होती. संघटनात्मक जबाबदाऱ्यांसोबतच त्या स्थानिक पातळीवरही सक्रिय होत्या.

लज्जा राणी गर्ग यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर भाजप कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी त्यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा देत शोक व्यक्त केला. धौलानाचे आमदार तथा राज्य मंत्री धर्मेश सिंह तोमर, भाजपचे क्षेत्रीय उपाध्यक्ष प्रवीण मित्तल, हरीश अग्रवाल, विनय अग्रवाल आणि जिल्हा मीडिया प्रभारी अमित टांक यांच्यासह अनेक भाजप नेते आणि स्थानिक नागरिकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी नेत्यांनी लज्जा राणी गर्ग यांच्या निधनामुळे पक्ष संघटनेची मोठी हानी झाल्याचे सांगत शोक व्यक्त केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Abhijeet Dipke: अभिजीत दीपकेला धोका, ते काहीही करू शकतात; आईने पोलिसांवर केले गंभीर आरोप

Rajgad Tragedy : राजगडावर मोठी दुर्घटना! ट्रेंकिंग करताना तरुण अचानक कोसळला अन्...

Maharashtra News Live Update: अभिजित दिपकेंसह सीपेजीचे ३ नेते कपिल सिब्बल यांच्या निवासस्थानी

Cucumber : काकडी खाताना तुम्ही नकळत करताय 'ही' चूक, वेळीच ओळखा अन् गंभीर समस्यांपासून वाचा

Pune : पिंपरी-चिंचवडमध्ये धक्कादायक घटना! धावत्या रुग्णवाहिकेतून रुग्ण खाली पडला

SCROLL FOR NEXT