Minister resignation news saam tv
देश विदेश

Minister resignation news: मला मंत्रिमंडळातून मुक्त करा! केंद्रीय मंत्र्यांचं थेट पंतप्रधान मोदींना पत्र, पदाचा आणि खासदारकीचाही दिला राजीनामा

Union Minister News: केंद्रीय राज्यमंत्री एल. मुरुगन यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. २०२९ च्या निवडणुकीपूर्वी तमिळनाडूमध्ये काम करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमधून राजीनाम्यामागील भूमिका स्पष्ट झाली.

Surabhi Jayashree Jagdish

माहिती आणि प्रसारण राज्य मंत्री एल. मुरुगन यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. याचसोबत त्यांनी राज्यसभा आणि सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे. एल मुरुगन हे दीर्घकाळ केंद्र सरकारमध्ये राज्य मंत्री म्हणून काम करत होते. त्यांनी सोशल मीडियावरील एक्स या प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत राजीनामा देण्यामागचं कारण सांगितलं.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची आणि तमिळनाडूची सेवा करण्याची संधी मिळणं हा आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा सन्मान असल्याचं त्यांनी म्हटलंय. केंद्रीय राज्यमंत्री एल मुरुगन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून थेट मंत्रिमंडळातून मुक्त करण्याची विनंती केली आहे. २०२९ च्या निवडणुकीपूर्वी तामिळनाडूमध्ये काम करण्याची व्यक्त इच्छा केली होती.

काय म्हटलंय एक्स पोस्टमध्ये?

एल. मुरुगन यांनी त्यांच्या पोस्टमध्ये सांगितलं की, ते एका रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुराचा मुलगा आहेत. अशा परिस्थितीतून पुढे येत पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्रिपरिषदेत काम करण्याची संधी मिळणं हे त्यांच्यासाठी मोठं भाग्य आहे. आता त्यांना पुन्हा एकदा जमिनीवर उतरून काम करायचं आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत राहून काम करण्याची त्यांची इच्छा आहे.

२०२९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी तमिळनाडूमध्ये भाजप पक्ष अधिक मजबूत करण्यासाठी स्वतःला पूर्णपणे झोकून देणार असल्याचंही त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. ‘देश सर्वात आधी, त्यानंतर पक्ष आणि सर्वात शेवटी स्वतः’ असा संदेशही त्यांनी आपल्या पोस्टमधून दिला आहे.

एल. मुरुगन यांचा राजकीय प्रवास

एल. मुरुगन हे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी जुलै २०२१ ते जून २०२४ या काळात मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयात राज्यमंत्री म्हणून काम केलं आहे. त्याआधी २०१७ ते २०२० या काळात त्यांनी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे (NCSC) उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली होती.

कायद्याचं शिक्षण घेतल्यानंतर वकिली

एल. मुरुगन यांचा जन्म २९ मे १९७७ रोजी तमिळनाडूतील नामक्कल जिल्ह्यातील कोनूरमध्ये झाला. त्यांनी चेन्नईमधील तमिळनाडू डॉ. आंबेडकर विधी महाविद्यालयातून कायद्याचं शिक्षण घेतलं. त्यानंतर मद्रास विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं आणि डॉक्टरेटची पदवी मिळवली.

महाविद्यालयात शिकत असतानाच ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी (ABVP) जोडले गेले. पुढे १९९७ मध्ये ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सदस्य झाले. त्यांनी जवळपास १५ वर्षे वकिली केली. याशिवाय मद्रास उच्च न्यायालयात भारत सरकारचे स्थायी वकील म्हणूनही त्यांनी काम पाहिलं. भाजपशी संबंधित अनेक महत्त्वाच्या कायदेशीर प्रकरणांमध्ये त्यांनी वकिलाची भूमिका बजावली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : महाविकास आघाड़ी भूमिकेमुळे शेकाप नाराज

'या' तारखेला जन्मलेला मुली असतात खडूस; भांडणात सासूबाईंची करतात बोलती बंद

राहुल गांधींच्या निवासस्थानी 'चाय पे चर्चा', इंडिया आघाडीच्या बैठकीत काय ठरलं? प्रमुख नेत्यांनी सांगितला पुढचा प्लान

Breast Cancer: पुरूषांनाही होतो ब्रेस्ट कॅन्सर, 'या' १० लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका

मोठी बातमी! राज्यातील तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाची कुठे झाली बदली?

SCROLL FOR NEXT