Kolkata Firing Twitter/@ANI
देश विदेश

कोलकाता: पोलीस कर्मचाऱ्याने केला अंदाधुंद गोळीबार; महिलेचा मृत्यू, त्यानंतर...

आज शुक्रवारी दुपारी २.१५ च्या सुमारास कोलकाताच्या पार्क सर्कस भागात बांगलादेश उप उच्चायुक्तालयाजवळ अंदाधुंद गोळीबार करण्यात आला.

वृत्तसंस्था

कोलकाता: आज शुक्रवारी दुपारी २.१५ च्या सुमारास कोलकाताच्या पार्क सर्कस भागात बांगलादेश उप उच्चायुक्तालयाजवळ अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. येथे पोलीस कर्मचाऱ्याने 10-15 राऊंड गोळीबार करून आत्महत्या केली. एसएलआर रायफलने अंदाधुंद गोळीबार करून त्याने दुचाकीस्वार महिलेला ठार केले, तर दुचाकीचालक गोळी लागल्याने जखमी झाला आहे. नंतर त्याने स्वत:वरही गोळी झाडली आहे. या गोळीबारात पायी जात असलेली एक महिलाही जखमी झाली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

गोळीबाराची माहिती मिळताच कोलकाता पोलिसांनी घटनास्थळ गाठून परिसराचा पंचनामा केला. मिळालेल्या माहितीनुसार, त्याने सुमारे 10-15 गोळ्या झाडल्या, त्यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या एका महिलेला गोळ्या लागून तिचा मृत्यू झाला. ही महिला दुचाकीवर जात होती त्यावेळी दुचाकी चालकालाही गोळी लागली आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलिस लोकांकडून माहिती गोळा करत आहेत. तर मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. या खळबळजनक घटनेनंतर परिसरातील दुकानेही बंद करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Old Pension Scheme : सरकारी कर्मचाऱ्यांची लॉटरी! जुनी पेन्शन योजना परत येणार; 'या' राज्य सरकारच्या निर्णयाने खळबळ

Maharashtra News Live Update: पंढरपूरमध्ये मिरवणूकीच्या कार्यक्रमात मंदिरासमो हवेत गोळीबार

Jio Recharge: खुशखबर! फक्त 666 रुपयांमध्ये इतक्या दिवसांची वैधता, Jio चा जबरदस्त रिचार्ज प्लान

Election Commission: २०२९च्या लोकसभा निवडणुकीवेळी मोठा बदल होणार; मतदान केंद्रांची संख्या वाढणार, RTIमधून खुलासा

Live Update : शिंदे की ठाकरे, शिवसेना कुणाची? कोर्टात नेमकं काय झालं? वाचा A टू Z अपडेट

SCROLL FOR NEXT