kolkata Case  Saam Digital
देश विदेश

kolkata Doctor Case : घराबाहेर ४०० पोलिसांचा गराडा, जबरदस्तीने अंत्यसंस्कार; कोलकाता अत्याचार प्रकरणातील पीडितेच्या वडिलांचा खळबळजनक आरोप

kolkata Case Update : कोलकाता अत्याचार प्रकरणातील पीडित डॉकरच्या वडिलांनी घराबाहेर ४०० पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता, अंत्यसंस्कार करण्यासाठी वरून प्रचंड दबाब होता, असा गंभीर आरोप केला आहे.

Sandeep Gawade

कोलकाता महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचार प्रकरणानंतर संपूर्ण देश हादरला होता. आता पीडित डॉक्टरच्या तरुणांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे पुन्हा खळबळ माजली आहे. बुधवारी रात्री एका निषेध आंदोलना दरम्यान तरुणीच्या वडिलांनी, मुलीचा मृतदेह सोपवल्यानंतर पुढील विधी करण्यासाठी वेळ मागितली मात्र घराबाहेर ४०० पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता आणि त्यात त्वरित अंत्यसंस्कार करण्यासाठी वरून प्रचंड दबाब होता, आपल्या इच्छेविरुद्ध अंत्यसंस्कार करण्यास भाग पाडल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

कोलकाता पोलिसांच्या उपायुक्तांवरही त्यांनी गंभीर आरोप केले आहेत. दुःखात असतानाही रुग्णालयातून घरी परतल्यानंतर त्यांनी पैशांचं आमिष दिल्याचं त्यांनी म्हटलं आहे. स्मशानभूमीत अंत्यसंस्कारचं शुल्कही माफ करण्यात आलं. हे कोणी केलं अद्याप समजू शकलेलं नाही, मात्र माझ्या मुलीला कसं वाटलं असेल की एक बाप मुलीच्या अंत्यसंस्काराचा खर्चही करू शकत नाही, हे खूप वेदनादायी आहे.

पीडितेच्या एका नातेवाईकाने सांगितलं की, एका साध्या कागदावर सही करण्यासाठी सांगण्यात आलं होतं, आम्हाला धक्का बसला आहे, त्यामुळे काही औपचारिकता बाकी आहेत, कागदावर लिहून द्या, असं पोलिसांनी सांगितलं. कोलकाता पोलिसांनी मात्र पीडितेच्या कुटुंबीयांच्या या आरोपांवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

९ ऑगस्ट रोजी सकाळी कोलकातामधील आरजी कारच्या सेमिनार रूममध्ये डॉक्टरांचा मृतदेह आढळून आला होता. सायंकाळी ही बातमी त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचली होती. पोलीस घटनास्थळी पोहोचेपर्यंत आरजी कारच्या ज्युनियर डॉक्टरांनी मोठं आंदोलन सुरू केलं. फॉरेन्सिक तपासणीनंतर त्याच दिवशी पीडितेचे पोस्टमार्टम करण्यात आलं होतं. त्यानंतर रात्री मृतदेह पालकांच्या ताब्यात देण्यात आला आणि त्याच रात्री अंत्यसंस्कार झाले. त्यामुळे इतक्या तडकाफडकी अंत्यसंस्कार करण्यात आल्यामुळे पोलिसांवर संशय व्यक्त केला जात आहे. त्यातचं मुलीच्या वडिलांनी आता नवीन आरोप केल्यामुळे खळबळ माजली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'Saiyara' तू तो बदला नहीं है... या ट्रेंडींग गाण्याचा अर्थ काय?

Asia Cup 2025 schedule : भारत-पाकिस्तान भिडणार, तारीख ठरली! आशिया चषक स्पर्धेचं संपूर्ण वेळापत्रक

Bhaskargad : मित्रांसोबत नाशिकला गेलाय? 'भास्करगड'ची आवर्जून सफर करा

Maharashtra Live News Update: पोहण्यासाठी गेलेल्या 20 वर्षीच्या तरुणाचा तलावात बुडून मृत्यू,नागपूरमधील घटना

Gautam Gambhir : टीम इंडियाची अवस्था 'गंभीर'; जबाबदार कोण? आकडेवारी चिंता वाढवणारी

SCROLL FOR NEXT