Kolkata Crime News Saam TV
देश विदेश

Viral News : आई आणि मुलीचे एकाच तरुणासोबत अफेयर; आधी घरी बोलावलं आणि मग...

एका प्रेमाच्या लढाईनं सगळ्यांनाच हादरवून टाकलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

KolkataCrime News : प्रेम कधी कोणावर होईल सांगता येत नाही. प्रेमाला जात-पात तसेच वयाचं बंधन नसतं. प्रेमासाठी लोकं वाटेल ते करतात. पण प्रेमात जर फसवणूक झाली तर त्याचे भयंकर परिणाम देखील पाहायला मिळतात. असाच काहीसा एक प्रकार दक्षिण कोलकत्ता (Kolkata) येथून समोर आलाय. येथील एका प्रेमाच्या लढाईनं सगळ्यांनाच हादरवून टाकलं आहे. (Breaking Marathi News)

खरंतर प्रेमात आणि लढाईत सगळं माफ असतं असं म्हणतात. मात्र, एका त्रिकोणी प्रेम संबंधात अशा काही (Viral News) गोष्टी घडल्या आहेत. ज्या कायद्याच्या नजेरत कधीही माफ केल्या जाऊ शकत नाही. दक्षिण कोलकत्ता येथील हरिदेवपूर येथे एका तरुणाचा मृतदेह बेवारसस्थितीत आढळून आला होता. या हत्येचं गुढ उलगडण्यात पोलिसांना यश आलंय.

नेमकं काय घडलं?

अयान असं मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचं नाव आहे. पोलिस सूत्रांनी दिेल्या माहितीनुसार, अयानची गेल्या ५ वर्षांपासून एका तरुणीसोबत ओळख होती. याची कल्पना तरुणीच्या आईलाही होती. त्यामुळे अयानचे तरुणीच्या घरी येणे जाणे सुरू होते. एकेदिवशी अयान हा संबधित तरुणीच्या घरी गेला आणि परतलाच नाही. (Tajya Batmya)

अयानच्या कुटुंबीयांनी आरोप केला आहे की संबधित तरुणीच्या आईचेही अयानसोबत अनैतिक संबंध होते. अयान जस जसा या मुलीच्या घरी येत राहिला त्याची ओळख या मुलीच्या आईशी देखील झाली. ज्यानंतर आई-मुलगी दोघेही प्रेमावरुन भांडायचे असं देखील म्हटलं जात आहे.

अयानच्या वडिलांनी दावा केला, की दशमीच्या रात्री तो तरुणीला भेटायला तिच्या घरी गेला होता. त्यावेळी सुद्धा अयानवरून तरुणी आणि तिच्या आईमध्ये भांडण झालं. याच भांडणातून दोघींनी त्याची हत्या केली असावी असा संशय आहे. दरम्यान, अयानच्या वडिलांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास सुरू केलाय.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Black Tea: थकवा घालवायचाय? रोज सकाळी प्या ब्लॅक टी, शरीराला मिळतील अनेक फायदे

Matheran Mini Train : पर्यटकांसाठी खुशखबर! नेरळ-माथेरान मिनी ट्रेन ६ नोव्हेंबरपासून धावणार | VIDEO

Local Body Election : युती नकोच! राज ठाकरेंना काँग्रेसचा जोरदार धक्का, उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार?

Maharashtra Live News Update: राज्यात थंडीला सुरुवात होण्याची शक्यता

Local Body Election : नगराध्यक्ष कोण? निवडणुकीच्या घोषणेआधीच भाजपची ३-३ नावे, प्रदेशाध्यक्षांकडे यादी पोहचली

SCROLL FOR NEXT