Odisha Bus Accident News Saam TV
देश विदेश

Bus Accident: चालकाला डुलकी लागली अन् घात झाला; प्रवाशांनी खचाखच भरलेली बस उड्डाणपुलावरून कोसळली; भयानक VIDEO

Odisha Bus Accident: चालकाला डुलकी लागल्याने प्रवाशांनी खचाखच भरलेली बस थेट उड्डाणपुलावरून खाली कोसळली. या घटनेत ५ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर अनेकजण जखमी झाले आहेत.

Satish Daud

Odisha Bus Accident News

चालकाला डुलकी लागल्याने प्रवाशांनी खचाखच भरलेली बस थेट उड्डाणपुलावरून खाली कोसळली. या घटनेत ५ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर अनेकजण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. अंगाचा थरकाप उडवणारी ही घटना ओडिशातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६ वर सोमवारी रात्रीच्या सुमारास घडली. (Breaking Marathi News)

मृतांमध्ये एका महिलेसह ५ पुरुषांचा समावेश आहे. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त बस (Bus Accident) पश्चिम बंगालमधील कोलकात्याला जाण्यासाठी निघाली होती. या बसमधून जवळपास ५० प्रवासी प्रवास करीत होते.

सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास बस ओडिशातील राष्ट्रीय महामार्ग १६ वर आली असता, बसचालकाला अचानक डुलकी लागली. त्यामुळे काही क्षणातच बस अनियंत्रित होऊन पुलावरून खाली कोसळली. अपघात इतका भीषण होता, की बसचा अक्षरश: चक्काचूर झाला.

या अपघातात एका महिलेसह ५ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर ४० हून अधिक प्रवासी जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांसह पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. या घटनेवर ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. त्याचबरोबर अपघातात मृत्यू झालेल्या मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ३ लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. पटनायक यांनी जखमींवर उपचारासाठी योग्य ती व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : बांबूच्या जोडीतून गर्भवती महिलेची सात किलोमीटरची पायपीट....

Dnyanda Ramtirthkar: 'लग्नानंतर होईलच प्रेम' मधील काव्याचं शिक्षण किती?

Karachi building collapse : पाकिस्तानात चमत्कार! इमारत कोसळून हिंदू कुटुंबातील २० जणांचा मृत्यू, पण 'ती' आश्चर्यकारकरित्या बचावली

Shopping For Ladies: प्रत्येक महिलेने स्वतःसाठी खरेदी करायला हव्या 'या' महत्वाची गोष्ट

Maharashtra Politics: अजित पवारांनी बैठक रद्द का केली? कोणता दलाल आडवा आला? – नाना पटोलेंचा विधानसभेत घणाघात| VIDEO

SCROLL FOR NEXT