Police Saam Tv
देश विदेश

धक्कादायक! आणखी एका मॉडेलचा मृतदेह आढळला, २ आठवड्यांतील चौथी घटना

यापूर्वी मॉडेल मंजूषा नियोगी, बिदिशा डी. मुजूमदार, पल्लवी डे यांचे मृतदेह संशयास्पदरित्या आढळले होते.

Nandkumar Joshi

कोलकाता: कोलकातामध्ये (kolkata) आणखी एका मॉडेलचा मृतदेह (Model dead body) आढळून आला आहे. घरातच पंख्याला लटकलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळला. सरस्वती असं या मॉडेलचं नाव असून, ती १८ वर्षांची होती. गेल्या दोन आठवड्यांतील ही चौथी घटना आहे. यापूर्वी मॉडेल मंजूषा नियोगी, बिदिशा डी. मुजूमदार, पल्लवी डे यांचे मृतदेह संशयास्पदरित्या आढळले होते. त्यांनी आत्महत्या केली असावी किंवा त्यांची हत्या झाली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत असून, पोलीस (Police) त्या दिशेने तपास करत आहेत. पोलीस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, मृतदेह विच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवाल अद्याप यायचा आहे.

पोलीस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, सरस्वती ही मेकअप आर्टिस्ट होती. ती बेदियाडांगा परिसरात राहत होती. सरस्वती कंपन्या आणि उद्योगांसाठी मॉडेलिंग करत होती. काही उत्पादनांसाठी तिला काम मिळाले होते. सरस्वतीचा मृतदेह तिच्या घरातील खोलीत पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. शनिवारी रात्री हा प्रकार उघडकीस आला. तिने गळफास घेऊन आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेचा तपास सुरू आहे. ही आत्महत्या आहे की हत्या, या दिशेनेही तपास सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. प्राथमिक तपासात ही तिने आत्महत्या केली असावी, असे सांगितले जात आहे.

सरस्वतीच्या आजीने सर्वात आधी तिचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत बघितला. त्यानंतर आजीने घरातील स्वयंपाकघरात असलेल्या चाकूने ओढणी कापून तिला खाली उतरवले. त्यानंतर तिला नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयातून या घटनेबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली, अशीही माहिती पोलिसांकडून देण्यात आली. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, सरस्वतीचे वडील काही वर्षांपूर्वीच संपूर्ण कुटुंबाला सोडून निघून गेले होते. सरस्वतीला तिची आई आणि काकीने सांभाळली. घटना घडली त्यावेळी आई आणि काकी कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. दरम्यान, पोलिसांनी सरस्वतीचा मोबाइल ताब्यात घेतला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT