Anantnag Gunfight Ends 7 Days Saam TV
देश विदेश

Jammu Kashmir: ७ दिवसांच्या आत घेतला बदला; भारतीय जवानांनी लपलेल्या दहशतवाद्याला शोधून टिपला

Kokernag Encounter: भारतीय जवानांनी टेकड्यांमध्ये लपून बसलेल्या दहशतवाद्यांचं काम तमाम केलंय.

Ruchika Jadhav

Jammu Kashmir News:

जम्मू-काश्मीरमध्ये कोकरनागमध्ये सर्च ऑपरेशनवेळी दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत भारतीय लष्करातील २ अधिकारी आणि एक पोलीस अधिकारी शहीद झाला होता. देशासाठी त्यांनी दिलेलं बलिदान भारतीय लष्करानं व्यर्थ जाऊ दिलं नाही. या घटनेच्या अवघ्या सात दिवसांतच भारतीय जवानांनी बदला घेतला. कोकरनागच्या डोंगराळ भागात लपून बसलेल्या लश्कर ए तोयबाच्या कमांडरला शोधून त्याचा खात्मा केला. (Latest Marathi News)

नेमकं काय घडलं होतं?

कोकरनागमध्ये लपून बसलेल्या दहशतवाद्यांचा शोध सुरू होता. भारतीय लष्कराने १२ सप्टेंबरपासून सर्च ऑपरेशन सुरू केलं होतं. दुसऱ्याच दिवशी दहशतवादी आणि भारतीय जवानांमध्ये चकमक झाली. यामध्ये भारतीय लष्कराचे दोन अधिकारी आणि जम्मू काश्मीर पोलीस दलातील अधिकारी शहीद झाला होता.

चकमकीत लष्कराचे कर्नल मनप्रीत सिंग, मेजर आशिष धोनचक आणि जम्मू-काश्मीर पोलिसांचे डीएसपी हुमायून भट शहीद झाले होते. यानंतर भारतीय लष्कराने शोधमोहीम आणखी तीव्र केली.

१३ सप्टेंबरला हल्ला झाल्यावर पंजाल टेकडीवर सर्व दहशतवादी लपून बसले होते. सुरक्षा दलांनी त्यांचा खात्मा करण्यासाठी पीर पंजाल टेकडीवर ड्रोनच्या मदतीने शोध घेतला. तसेच रॉकेटच्या साह्याने हल्लाही चढवला. भारतीय लष्कराच्या कारवाईनं दहशतवाद्यांची पाचावर धारण बसली आणि पलीकडून होणारा गोळीबार थांबला. शोध मोहिमेदरम्यान एका दहशतवाद्याचा मृतदेह सापडला आहे. तीन दहशतवादी ठार झाल्याची प्राथमिक माहिती आहे, असे सांगण्यात येत आहे.

पीर पंजाल टेकडीच्या परिसरात दहशतवादी लपून बसले आहेत. या टेकडीवर अनेक गुहा आहेत. हा परिसर दहशतवाद्यांचा अड्डा बनला आहे. अशा ठिकाणी लपलेल्या तीन ते चार दहशतवाद्यांचा शोध घेणं भारतीय जवानांसाठी फार मोठे आव्हान होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: रोहित पवारांना धक्का; कर्जत जामखेडमध्ये राम शिंदे आघाडीवर

Yeola Constituency : येवल्यातून छगन भुजबळ यांना केवळ 86 मतांची आघाडी | Marathi News

Assembly Election Result: सर्वात मोठी बातमी! कॉग्रेसचे ३ दिग्गज नेते पिछाडीवर, महायुतीचा डाव पडला भारी

Maharashtra Election Result: एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांचं काय झालं? पाहा एका क्लिकवर

Maharashtra Assembly Election Result: सुरुवातीच्या कलात काँग्रेसचे 'हे' तीन दिग्गज नेते पिछाडीवर

SCROLL FOR NEXT