पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन दिवसीय दौऱ्यानंतर लक्षद्वीपविषयी जाणून घेण्याची सर्वांची उत्सुकता वाढली आहे. लक्षद्वीपच्या पर्यटनाची बरीच चर्चा होतेय. लोकं याकडे एक उत्तम पर्यटन स्थळ म्हणून पाहत आहेत. (latest marathi news)
लक्षद्वीप हा भारतातील सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश आहे. येथे 34 बेटांचा सुंदर समूह आहे. लक्षद्वीपची राजधानी कवरत्ती आहे. स्वातंत्र्याच्या 9 वर्षानंतर म्हणजे 1956 मध्ये लक्षद्वीप केंद्रशासित प्रदेश बनला. त्यानंतर 26 वर्षांनंतर, म्हणजे 1973 मध्ये त्याचे नाव लक्षद्वीप झाले. येथे 68 हजार लोकसंख्या राहते. लक्षद्वीप हे केरळच्या कोचीपासून 440 किलोमीटर अंतरावर आहे. येथे 36 लहान बेटांचा समूह आहे. 2011 च्या जनगणनेनुसार लक्षद्वीपची एकूण लोकसंख्या सुमारे 64 हजार 473 आहे. यामध्ये पुरुषांची संख्या 33,123 आणि महिलांची संख्या 31,350 आहे.
लक्षद्वीपमधील पर्यटन उद्योग
लक्षद्वीपमध्ये इस्लामचा उदय 7 व्या शतकात झालाय. येथील क्षेत्रफळ सुमारे 32 चौरस किलोमीटर आहे. लक्षद्वीपमध्ये 10 वस्ती असलेली बेटे आहेत. यात कवरत्ती, अगत्ती, अमिनी, कदम, किलाटन, चेतलाट, बित्रा, अंदोह, कल्पना आणि मिनीकॉय यांचा समावेश आहे. बित्रा येथे फक्त 271 लोक राहतात. बंगाराम बेटावर फक्त 61 लोक राहतात. येथे मल्याळम भाषा बोलली जाते.
लक्षद्वीपमधील लोकांच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा स्त्रोत म्हणजे मासेमारी आणि नारळाची शेती आहे. लक्षद्वीपमधील पर्यटन उद्योग झपाट्याने वाढला आहे. गेल्या काही दिवसांपासून लक्षद्वीपला भेट देण्याकडे पर्यटकांचा कलही दिसून येतोय. गेल्या वर्षी लक्षद्वीपला जाणाऱ्या पर्यटकांची संख्या सुमारे 25 हजार होती.
लक्षद्वीपबद्दल प्रचलित कथा
लक्षद्वीपबद्दल अनेक कथा प्रचलित आहेत. केरळचा शेवटचा राजा चेरामन पेरुमल याची कारकिर्द होती. काही अरब व्यापार्यांच्या सांगण्यावरून राजा चेरामन पेरुमलने इस्लाम धर्म स्वीकारला होता. त्यानंतर त्याने आपली राजधानी क्रॅंगनोर (सध्याचे कोडुंगल्लूर, कोचीचे जुने बंदर शहर) सोडले आणि ते मक्केला गेले, असं मानलं जातं. राजाची एक नौका तीव्र वादळात अडकली होती. ती आता बंगाराम म्हणून ओळखल्या जाणार्या बेटावर उद्ध्वस्त झाली, असं मानलं जातं. राजा बेपत्ता झाल्याची माहिती मिळताच, राजाच्या शोधासाठी बोटी मक्केच्या किनाऱ्यावर पाठवण्यात आल्या. तेथून ते अगत्ती बेटावर गेले होते.
राजा परतल्यानंतर राजाने खलाशांच्या आणि सैनिकांच्या आणखी एका गटाने अमिनी बेट शोधून काढले आणि तेथे राहू लागले. अमिनी, कवरत्ती, आंद्रोट आणि काल्पेनी या बेटांवर प्रथम छोट्या वस्त्या सुरू झाल्या. नंतर या बेटांतील लोक अगाट्टी, किल्तान, चेतलाट आणि कदम या बेटांवर स्थलांतरित झाले होते, अशी आख्यायिका सांगितली जाते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.