Police investigate after unidentified attackers opened fire at Khan Sir's coaching institute in Patna, damaging the entrance gate and signboard. 
देश विदेश

Khan Sir : मोठी खळबळ! खान सरांच्या कोचिंग इन्स्टिट्यूटवर ६ राऊंड गोळीबार; गोळ्या लागल्या अन्... २ तासांत काय काय घडलं?

Khan Sir Coaching Centre Attack : पाटण्यातील प्रसिद्ध खान सर यांच्या कोचिंग सेंटरवर अज्ञातांकडून ६ राऊंड गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हल्ल्यानंतर परिसरात खळबळ उडाली.

Namdeo Kumbhar

Khan Sir coaching centre firing incident in Patna : देशभरात आपल्या अनोख्या शिकवण्याच्या शैलीमुळे प्रसिद्ध असलेले 'खान सर' (Khan Sir) यांच्या कोचिंग सेंटरवर मंगळवारी अज्ञातांनी अंधाधुंद गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बाईकवरून आलेल्या गुंडांनी कोचिंग इन्स्टिट्यूटवर ६ राऊंड फायर केले. या जीवघेण्या हल्ल्यात गोळ्या लागल्यामुळे सेंटरचे मुख्य गेट आणि फलक, बोर्ड फुटला आहे. खान सरांनी कोचिंग इन्स्टिट्यूट काही काळासाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांची धावपळ उडाली.

गोळ्या लागल्या अन्... काय घडलं घटनास्थळावर?

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पाटण्यातील कदमकुआं पोलीस ठाण्याच्या हद्दीत खान सरांचे 'खान जीएस रिसर्च सेंटर' (Khan GS Research Centre) आहे. नेहमीप्रमाणे या ठिकाणी विद्यार्थ्यांची मोठी गर्दी होती. दरम्यान, अचानक बाईकवरून आलेल्या काही समाजकंटकांनी कोचिंग सेंटरच्या दिशेने गोळ्या झाडण्यास सुरुवात केली.

गोळीबाराचे आवाज ऐकताच परिसरात एकच पळापळ आणि गोंधळ उडाला. या गोळीबारात अनेक गोळ्या कोचिंग सेंटरच्या मुख्य गेटला आणि बाहेर लावलेल्या बोर्डाला लागल्या. गोळ्या लागल्यामुळे कोचिंग सेंटरचा मुख्य लोखंडी दरवाजा आणि फलक (Board) तुटले. सुदैवाने या गोळीबारात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. पण काही सेकंदांचा फरक पडला असता तर मोठा अनर्थ घडला असता.

घटनेनंतरच्या २ तासांत काय काय घडलं?

समाजकंटकांनी दिघा येथील बाटा येथे राहणाऱ्या खान सरांचे कर्मचारी तथा चुंचुन कुमार यांना पकडून काठ्यांनी मारहाण केली. त्यामुळे त्यांच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्त निघाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

टोळक्याने कॅम्पसमधील 'खान ग्लोबल स्टडीज'च्या फलकाची तोडफोड केली आणि प्रवेशद्वाराचे नुकसान केले. यामुळे परिसरात सुमारे दोन तास गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. कोचिंग सेंटरबाहेरील रस्त्यावर विद्यार्थी आणि नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. घटनेची माहिती मिळताच, एसएसपी कार्तिकेय के. शर्मा, सिटी एसपी सेंट्रल आणि दीक्षा कदमकुआं, पीरबहोर व सुलतानगंज पोलीस ठाण्यांतील पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र तोपर्यंत हल्लेखोर पळून गेले होते.

खान सरांनी काय सांगितले?

या संपूर्ण गदारोळानंतर खान सरांनीही प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितले की हल्लेखोर हे समाजकंटक होते आणि त्यांनी घटनास्थळी उपस्थित असलेल्यांनाही धमक्या दिल्या होत्या. एवढ्या कमी शुल्कात मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात आहे आणि चांगले निकालही लागत आहेत, यावर काही लोकांचा आक्षेप आहे. प्रशासनाने कोचिंग इन्स्टिट्यूटमधील सुरक्षा वाढवली पाहिजे.

पोलिसांचा तपास -

पोलिसांच्या फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून गोळ्यांची रिकामी काडतूसं (Shells) जप्त केली. गेट आणि बोर्डावर लागलेल्या गोळ्यांच्या निशाणांची पाहणी करण्यात आली. पोलिसांनी कोचिंग सेंटरच्या परिसरातील सर्व सीसीटीव्ही (CCTV) फुटेज ताब्यात घेतले आहेत. आरोपींचा माग काढण्यासाठी पोलिसांची वेगवेगळी पथके रवाना करण्यात आली. हा गोळीबार खंडणीसाठी केला की यामागे काही जुना वाद आहे, यादृष्टीने तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibaug Fort : समुद्राच्या लाटांमध्ये उभा असलेला ३०० वर्षांचा भव्य किल्ला! अलिबागला गेल्यावर 'हे' सिक्रेट ठिकाण नक्की पाहा

Easy Banana Cake Recipe : पिकलेल्या केळीपासून बनवा झटपट टेस्टी चॉकलेटी केक

2029 ला प्रयत्न करा, भाजपच्या दिग्गज नेत्याची विजय वडेट्टीवार यांना पक्षात येण्याची ऑफर; भर सभेत नेमकं काय घडलं?

Raksha Bandhan 2026: यंदाच्या रक्षाबंधनाला भावासाठी खरेदी करा चांदीची राखी; पाहा ७ लेटेस्ट डिझाईन्स

NCP Merger: राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत मोठी अपडेट; दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? शरद पवारांनी बोलावली तातडीची बैठक

SCROLL FOR NEXT