Destroyed residence of Iran’s Supreme Leader following a suspected targeted strike amid insider betrayal allegations Saam Tv
देश विदेश

कुटुंबातूनच गद्दारी, खामेनींना पडली भारी? खामेनींच्या घरातच अमेरिकेचा खबरी?

Khamenei Assassination Inside Job Conspiracy Analysis: खामेनींची घरातच त्यांची हत्या झाली... मात्र खामेनींच्या विरोधातील हा षडयंत्र नेमका कोणी आणि का रचला? कुटुंबातूनच झालेली गद्दारी खामेनींना कशी महागात पडली?

Suprim Maskar

भरभक्कम इराणी सुरक्षा व्यवस्थेचं कडं भेदून अमेरिका आणि इस्त्रायलनं खोमेनींचा गेम केला. या युद्धाचा शेवट आम्ही करु असं म्हणणाऱ्या खोमेनींना घरात घुसून ठार करण्यात आलं. पण खोमेनींची पक्की खबर त्यांच्या घरच्यांनीच दिली की त्यांच्या सहकाऱ्यांनी असा सवालये. कारण अमेरिका आणि इस्रायल हल्ल्याच्या तयारीत असल्याचं याआधीच खोमेनी आणि इराणी गुप्तचर विभागाला माहित असतांनाच एका महत्वाच्या बैठकीत खोमेनी आणि अतिमहत्वाच्या व्यक्ती हजर असतांना ही खबर हजार १० हजार किलोमीटर दूर असलेल्या अमेरिका आणि इस्त्रायला कशी मिळाली त्याच्या घरातलाच भेदी होता की त्यांच्या सहकाऱ्यानं या गुप्त भेटीची खबर दिली ? या मुळे काही सवाल जे त्यांच्या निकटवर्तीयांना खबरी ठरवतायेत

खामेनींचा फितूर कोण?

अतीमहत्वाच्या गुप्त बैठकीची माहिती लीक कशी झाली?

अशी बैठक कधीतरीच होते, मग याची खबर कशी लागली?

जीविताला धोका असूनही खमेनेईंचे पूर्ण कुटुंब एकत्र कसे होते?

खामेनींच्या सुरक्षारक्षकांमध्ये कोणी 'डबल एजंट' होता का?

कुटुंबातीलच व्यक्तीनं खामेनींचा विश्वासघात केला का?

उपग्रहाद्वारे मिळालेली चित्रे बैठकीची इतकी अचूक माहिती देऊ शकत नाही. त्यामुळे जर असा हल्ला झाला असेल तर तो फितुरीशिवाय शक्य नाही हे तितकंच खरंय. त्यामुळे खामेनींसारख्या सर्वोच्च नेत्यांच्या सुरक्षेत झालेली ही चूक होती की सापळा? असा सवाल आहे. मा ही हत्या अमेरिकेनं कशी घडवून आणली पाहा,

कसे मारले गेले खामेनी?

खामेनींच्या खात्म्याचा प्लॅन 2 महिने आधीच ठरला

इस्रायल-अमेरिकेच्या वाढत्या हालचालींमुळे खामेनींनी घरातील कार्यालयात घेतली बैठक

भूमिगत बंकर ऐवजी वरच्या मजल्यावर बैठक होत असल्याची पक्की खबर

सकाळी गुप्त बैठक सुरु झाल्यावर एकाच वेळी 30 बॉम्ब हल्ले

खामेनींचं सुरक्षित संकुल 30 सेंकदात बेचिराख

हल्ल्यानंतर निवासस्थानाचं भीषण स्फोट, आगीच्या ज्वाळा, काळा धूर आणि मातीचा ढिगाऱ्यात रुपांतर

युद्धाच्या इतिहासाच्या एका अघोषित नियमाची आज खामेनींच्या खात्म्यानंतर आठवण झालीये. किल्ला जिंकण्यासाठी कधीच आतलाच कोणीतरी फितूर असावा लागतो. इराणमध्येही अगदी तेच झालं. कुंपणानेच शेत खाल्लं आणि बलाढ्या सैन्य शक्तीला इतके दिवस रोखूनही अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यात खामेनींचा बळी गेला आणि इराणला मोठा धक्का बसला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Snake Video: सापांना पळवून लावणारी छडी? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

Mumbai Drug: मुंबईलाही झोम्बी ड्रग्जचा विळखा? व्हायरल व्हिडीओमुळे राज्यात खळबळ

RCB vs LSG: आरसीबीचा शानदार विजय; लखनौला चीतपट करताच बेंगळुरू संघाची पॉईंट्स टेबलमध्ये सरशी, मुंबई, केकेआरचं टेन्शन वाढलं

Maharashtra Politics: ठाकरे सेनेचं कार्याध्यक्षपद आदित्य ठाकरेंकडे? जूनमध्ये ठाकरे सेनेत मोठे बदल?

नेस्कोमध्ये तरुणाईला ड्रग्जचा 'कुरिअर डोस'; कॉन्सर्टमध्ये नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT