Monkeypox Update News  SAAM TV
देश विदेश

चिंता वाढली! केरळमध्ये मंकीपॉक्सची लक्षणे असलेल्या रुग्णाचा मृत्यू

देशात माकडपॉक्सचा धोका सातत्याने वाढत आहे.

वृत्तसंस्था

पत्तनंतिट्टा - देशात माकडपॉक्सचा (Monkeypox) धोका सातत्याने वाढत आहे. दरम्यान, शनिवारी केरळमध्ये मंकीपॉक्सची लक्षण असलेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. याआधी त्याला मंकीपॉक्सची लागण झाल्याचा संशय होता, पण आता या बातमीबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे. या व्यक्तीला मंकीपॉक्सची लागण झाल्याचे आढळून आले. त्याचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मात्र, त्यांचा मृत्यू मंकीपॉक्सच्या विषाणूमुळे झाला असल्याची पुष्टी अद्याप झालेली नाही.

केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले की, त्रिशूरमधील २२ वर्षीय मुलाच्या मृत्यूचे कारण मंकीपॉक्स असल्याचा संशय होता. त्याला यूएईमध्ये मंकीपॉक्सची लागण झाली होती. २१ जुलै रोजी तो भारतात पोहोचला, तर यूएई सोडण्याच्या एक दिवस आधी त्याचा चाचणी अहवाल सकारात्मक आढळला. त्यानंतर २७ जुलै रोजी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे आरोग्यमंत्र्यांचे म्हणणे आहे.

हे देखील पाहा -

याप्रकणी आता राज्य सरकारने उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. परदेशात केलेल्या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. थकवा आणि एन्सेफलायटीसमुळे त्याच्यावर त्रिशूरमध्ये उपचार सुरू होते, अशी माहिती राज्याच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी दिली.

मंकीपॉक्स हा जीवघेणा आजार नाही. उपचारात झालेल्या दिरंगाईची चौकशी केली जाईल. या मृत्यूबाबत आरोग्य विभागाने पुन्नूर येथे बैठकही बोलावली आहे, असही मंत्री वीणा जॉर्ज म्हणाल्या.

दरम्यान, मृत तरुणाची संपर्क यादी आणि प्रवास इतिहासचा अहवाल तयार करण्यात आला आहे. संपर्कात आलेल्या लोकांना आयसोलेशनमध्ये राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. WHO नुसार, ७८ देशांमधून १८ हजार हून अधिक रुग्ण नोंदवली गेली आहेत.

मंकीपॉक्स आजाराची लक्षणे :

मंकीपॉक्सची सामान्यत: लक्षणे ताप येणे,पुरळ आणि मोठ्या प्रमाणात गाठी (lymph node)येणे ही आहेत आणि त्यामुळे वैद्यकीय गुंतागुंत होऊ शकतात.

पुरळ पोट किंवा पाठी ऐवजी चेहऱ्यावर आणि हातपायांवर जास्त केंद्रित असते. पुरळ मोठयाप्रमाणात चेहरा ( ९५% ), हाताचे तळवे आणि पायांचे तळवे (७५%), तोंडातील व्रण (७०%) , जननेंद्रिय (३०%) आणि डोळे (२०%) दिसते.

मंकीपॉक्स हा सामान्यतः स्वयं-मर्यादित आजार आहे. ज्याची लक्षणे २ ते ४ आठवड्यांपर्यंत असतात. रुग्णाची परिस्थिती गंभीर होऊ शकते.मृत्यू दर १-१०% पर्यंत असू शकतो.

लहान मुलांमध्ये या आजारची लक्षणं जास्त तीव्र आढळून येते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Mahadevi Elephant: महादेवी' हत्तीणीचा वनताराकडे प्रवास सुरू; ग्रामस्थ भडकले पोलीस गाड्यांची तोडफोड

Bachchu Kadu: श्रीकृष्णाने कालियाला ठेचलं, तसं आम्ही सरकारचं नागधोरण ठेचू" – बच्चू कडूंचा इशारा | VIDEO

Maharashtra Politics: महामंडळावर निवडणुकीनंतरच नियुक्ती, इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा

Pandharpur News: चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री; सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोरखधंदा उघड

Maharashtra Politics :...तर सोलापुरातून तिरुपतीसाठीही विमान सेवा सुरू होणार; जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंना टोला

SCROLL FOR NEXT