kerala Wayanad landslide Saam TV
देश विदेश

Wayanad Landslide: केरळच्या वायनाडमध्ये भूस्खलनामुळे हाहाकार, मृतांचा आकडा १४३ वर, अजूनही शेकडो लोक बेपत्ता

Wayanad Landslides News Updates: केरळच्या वायनाडमध्ये भूस्खलन होऊन झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत १४३ जणांचा मृत्यू झाला असून शेकडो लोक जखमी झाले आहेत.

Satish Daud

केरळच्या वाडनाड येथे मंगळवारी मोठी दुर्घटना घडली. मुसळधार पावसाने भूस्खलन झाल्याने ४ गावं मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली. या दुर्घटनेत आतापर्यंत जणांचा मृत्यू झाला असून शेकडो लोक जखमी झाले आहेत. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. अजूनही २०० पेक्षा अधिकजण बेपत्ता असल्याची माहिती मिळतेय. प्रशासनाकडून त्यांचा शोध घेतला जातोय. या घटनेनं संपूर्ण देश हादरला आहे.

आपत्तीग्रस्त भागांत शोधमोहिम आणि बचावकार्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ढिगाऱ्याखाली अद्याप अनेकजण अडकल्याची शक्यता असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सतत येणाऱ्या पावसामुळे बचावपथकाला मदतकार्यात मोठे अडथळे येत आहेत. रात्री उशिरापर्यंत रेक्यू ऑपरेशन सुरू होतं.

आज बुधवारी सकाळी पुन्हा सर्च ऑपरेशन सुरू होणार आहे. अडकलेल्या लोकांची सुटका करण्यासाठी बचावकार्यात लष्कर, नौदल, एनडीआरएफ, राज्याचे आपत्ती निवारण दल, पोलिस, अग्निशमन दलाचे जवान सहभागी झाले आहेत. दुर्घटनेतील जखमींना रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मेपाडी भागात भूस्खलन झाले असून याचा फटका मुंडक्की, चूरामाला आणि नूलपुळ्ळा या गावांनाही देखील बसला. त्यामुळे शेकडो लोक मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. आतापर्यंत अनेकांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांची संख्या सर्वाधिक आहे.

या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केलंय. त्याचबरोबर जखमींवर तातडीने उपचार आणि सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. दुसरीकडे काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांनी देखील या घटनेवर दु:ख व्यक्त केलंय. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी आज वायनाड येथे जाऊन नागरिकांची भेट घेणार होते. मात्र मुसळधार पावसामुळे त्यांनी आपला दौरा रद्द केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akot News : मुसळधार पावसाने पूरजन्य स्थिती; अमीनापूर गावचा संपर्क तुटला, शेकडो ग्रामस्थ अडकले

Ind Vs Eng Oval Test : इंग्लंडविरुद्ध पाचव्या कसोटीत टीम इंडियात होणार मोठे बदल, जसप्रीत बुमराह खेळणार?

पहलगाम हल्ल्याचा बदला घेतलाच! ३ दहशतवाद्यांना धाडलं यमसदनी, अमित शहांनी संसदेत काय-काय सांगितलं?

Maharashtra Live News Update : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मनसेची बैठक

Monsoon Sweating : पावसाळ्यात जास्त घाम का येतो? यावर उपाय काय?

SCROLL FOR NEXT