Cheriyanad Railway Station Train, Venad Express SAAM TV
देश विदेश

Indian Railway : हेच मुंबईच्या स्टेशनवर घडलं असतं तर...? ट्रेन स्टेशनवर न थांबताच १ किमी पुढे गेली, थोड्या वेळानं घडली अविश्वसनीय गोष्ट...

Kerala Railway News : केरळहून शोरानुर जाणारी वेनाड एक्स्प्रेस निश्चित रेल्वे स्थानकावर न थांबताच एक किलोमीटरपर्यंत पुढे निघून गेली.

साम टिव्ही ब्युरो

Cheriyanad Railway Station Train : तुम्ही 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' बघितलात का? या चित्रपटातील राज आणि सिमरनला वेनाड एक्स्प्रेसची वाट बघावी लागली असती तर कथानकाचा शेवट वेगळाच झाला असता नाही का? बरं एक वेगळाच प्रश्न...हेच मुंबई उपनगरीय रेल्वे स्थानकावर घडलं असतं तर, मोठा गहजब झाला असता नाही का? हुश्शsss... विचार न केलेलाच बरा... केरळच्या चेरियनाड रेल्वे स्थानकावर असाच काहीसा प्रकार घडलाय. काय घडलं नेमकं? (Latest News Update)

केरळहून (Kerala) शोरानुर जाणारी वेनाड एक्स्प्रेस निश्चित रेल्वे स्थानकावर न थांबताच एक किलोमीटरपर्यंत पुढे निघून गेली. ट्रेन पुढे निघून गेल्यानंतर आपण ट्रेनला थांबा दिलाच नाही ही बाब लोको पायलटच्या लक्षात आली. या चुकीनंतर लोको पायलटनं दुरुस्ती करतानाच ट्रेन पुन्हा मागे घेतली.

चेरियनाड स्टेशनवर (Railway Station) ही ट्रेन पुन्हा आणण्यात आली. त्यानंतर प्रवाशांना घेऊन ही ट्रेन पुढे रवाना झाली. आश्चर्यकारक बाब म्हणजे चेरियनाड रेल्वे स्थानकावर कोणतीही सिग्नल यंत्रणा नसल्याचे सांगितले जात आहे. सिग्नल यंत्रणा केवळ ब्लॉक स्थानके म्हणजेच मोठ्या स्थानकांवर बसवलेली आहे.

लोको पायलटला या स्थानकावर ट्रेन थांबवायची होती. पण ट्रेन एक किलोमीटर पुढे गेल्यानंतर लोको पायलटच्या ही बाब लक्षात आली. त्यामुळे ट्रेन (Train) मागे घेत चेरियनाड रेल्वे स्थानकात आणण्यात आली. यामुळे ट्रेनचे वेळापत्रक बिघडले. तब्बल आठ मिनिटे विलंब झाला. पण नंतर लोको पायलटने ट्रेन वेळेत नेली.

रेल्वे मागणार लोको पायलटकडे उत्तर

रेल्वे प्रशासनाने सांगितले की, या प्रकारामुळे काही नुकसान झालं नाही. कुणालाही कसलाही त्रास झालेला नाही. काही प्रवाशांना चेरियनाड स्थानकावर उतरायचे होते. ट्रेन स्थानकावर पुन्हा आल्यानंतर प्रवाशांना उतरता आले, तर काही प्रवाशांना प्रवास करता आला. ट्रेन पुढे निघून गेल्यानंतर प्रवासी थोडे संभ्रमावस्थेत होते. नंतर ट्रेन पुन्हा आली आणि प्रवाशांना दिलासा मिळाला. लोको पायलटकडून उत्तर मागवण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: बायकोला खांबाला बांधलं, नवऱ्याकडून लाथाबुक्क्या अन् बेल्टने अमानुष मारहाण; मुलं विनवणी करत राहिले पण...

Traffic Block: वाहतूक कोंडीनं घेतला चिमुरड्याचा जीव; मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर २५ किलोमीटर वाहनांच्या रांगा

Vote Chori: राहुल गांधींचा नवा आरोप; राजुरात 6853 मतं वाढवल्याचा आरोप

Maharashtra Politics : बाळासाहेबांशेजारी दिघेंचा फोटो; शिंदे-ठाकरे सेनेत जुंपली, VIDEO

OBC Vs Maratha: लक्ष्मण हाकेंना मारण्यासाठी 11 जणांची टीम, मराठा नेते आक्रमक

SCROLL FOR NEXT