Manasvi Choudhary
कारल्याची भाजी म्हटलं अनेकांचे नाक मुरडले जाते. पण कारली जरी कडू असली तरी आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.
कारल्याची भाजी तुम्ही विशिष्ट पद्धतीने बनवली तर ती कडू लागत नाही. आज आम्ही तुम्हाला मसाला कारली रेसिपी सांगणार आहोत.
कारल्याची भाजी तुम्ही विशिष्ट पद्धतीने बनवली तर ती कडू लागत नाही. आज आम्ही तुम्हाला मसाला कारली रेसिपी सांगणार आहोत.
सर्वातआधी कारली स्वच्छ धुवून त्याच्या गोल आकारात चकत्या करून मीठ लावून ठेवा. त्यातील पाणी पिळून कारली स्वच्छ करा.
गॅसवर कढईमध्ये गरम तेलामध्ये कारल्याच्या चकत्या कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्या. आणि नंतर एका प्लेटमध्ये काढून घ्या.
यानंतर कढईमध्ये गरम तेलामध्ये जिरे, मोहरी आणि बारीक चिरलेला कांदा याची फोडणी द्या कांदा परतून झाल्यानंतर त्यात हळद, मसाला याचे मिश्रण टाका.
आता या मिश्रणात कारली, चिंच , गूळ आणि शेंगदाणा कूट हे मिक्स करा आणि शिजवून घ्या.
अशाप्रकारे चमचमीत मसाला कारली भाजी घरच्याघरी तयार होतील.