Manasvi Choudhary
छोले भाजी बनवण्यासाठी छोले, तेल, जिरे, तमालपत्र, दालचिनि तुकडा, हिरव्या मिरच्या, मोठे कांदे, टोमॅटो, आलं- लसूण पेस्ट, मसाला, हळद, धना पावडर, छोले मसाला, मीठ , कोथिंबीर हे साहित्य एकत्र करा
छोले भाजी बनवण्यासाठी सर्वात आधी कुकरमध्ये छोले, मीठ, दालचिनी आणि तेजपत्ता हे मसाले टाकून शिजवून घ्या.
गॅसवर एका पातेल्यात गरम तेलामध्ये मोहरी, जिरे, कढीपत्ता याची फोडणी द्या. या मिश्रणात बारीक चिरलेला कांदा घालून सोनेरी रंग होईपर्यंत परतून घ्या.
कांदा सोनेरी रंगाचा झाल्यानंतर मिश्रणात आलं-लसूण पेस्ट मिक्स करून परतून घ्या
मिश्रणात बारीक चिरलेला टोमॅटो टाकून तो मऊ होईपर्यंत शिजवा. आता त्यात हळद, लाल तिखट, धना पावडर आणि गरम मसाला टाकून मिक्स करा. चवीनुसार मीठ घाला.
नंतर या संपूर्ण मिश्रणात शिजवून घेतलेले छोले मिक्स करा आणि चांगले परतून घ्या. छोले मसाल्यात व्यवस्थित परतून घ्या.
आवश्यकतेनुसार या मिश्रणात पाणी घाला आणि त्यावर झाकण ठेवा. भाजी चांगली शिजल्यानंतर यावर कोथिंबीर घालून सर्व्हसाठी रेडी करा.