Kerala Accident Saamtv
देश विदेश

Kerala Accident: भीषण अपघात! भरधाव स्कूल बसची रिक्षाला धडक, एकाच कुटुंबातील चार महिलांसह ५ जणांचा मृत्यू

School Bus Rikshaw Accident: बसचा वेग जास्त होता आणि चुकीच्या दिशेने येत असल्याने हा अपघात झाला.

Gangappa Pujari

Keral Accident News:

केरळ राज्यातून एक दुर्देवी अपघाताची घटना समोर आली आहे. केरळच्या कासरगोड जिल्ह्यात सोमवार (२५, सप्टेंबर) रात्री स्कूल बस आणि ऑटोरिक्षा यांच्यात झालेल्या भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत पाच महिलांचा मृत्यू झाला. घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, केरळमधील कासारगोड जिल्ह्यात सोमवारी संध्याकाळी स्कूल बस आणि ऑटोरिक्षा यांच्यात भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भयंकर होता की यामध्ये चार महिलांचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला.

अपघाताबाबत पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्याने सांगितले की, प्राथमिक तपासानुसार बसचा वेग जास्त होता आणि चुकीच्या दिशेने येत असल्याने हा अपघात झाला. बस शाळकरी मुलांना त्यांच्या घरी सोडल्यानंतर परतत होती, त्यामुळे त्यात मुले नव्हती.

या अपघातात स्कूल बस आणि ऑटोचे मोठे नुकसान झाले आहे. दुर्देवी म्हणजे अपघातात मृत झालेल्या चार महिला एकाच घरातील होत्या. दरम्यान या प्रकरणी बस चालक पोलिसांच्या ताब्यात असून, लवकरच एफआयआर दाखल करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोल्हापूर जिल्ह्यातील धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस

Maharashtra politics : अमित शाहांचा थेट उद्धव ठाकरेंच्या खासदाराला फोन, राजकीय खेळी की फक्त शुभेच्छा?

ऑपरेशन सिंदूरवर आज चर्चा, अधिवेशन तापणार; सत्ताधारी-विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी होणार | Operation Sindoor

Amboli Tourism : आंबोलीजवळ असलेला छुपा धबधबा, इथं जाताच येईल फॉरेनचा फिल

Bhimashankar Temple: त्र्यंबकेश्वरनंतर भिमाशंकर मंदिरातही गळती, पहिल्या श्रावणी सोमवारमुळे मोठी गर्दी; भाविकांचे हाल, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT