Kerala News : केरळमध्ये एका व्यक्तीला डॉक्टरला मारहाण करणे चांगलेच महागात पडले आहे. या व्यक्तीने डॉक्टरावर वैद्यकीय तपासणी करत असताना त्याच्या पत्नीशी गैरवर्तन केल्याचा आरोप केला होता. या व्यक्तीने गंभीर आरोप केल्यानंतर रुग्णालयातील डॉक्टरला मारहाण केली होती. या प्रकरणात केरळ उच्च न्यायालयाने मारहाण करणाऱ्या व्यक्तीला अटकपूर्व जामीन नाकारला आहे . (Latest Marathi News)
केरळ (Kerala) उच्च न्यायालयातील न्यायाधीशांनी या प्रकरणावर सांगितले की, 'या घटनेचा गांभीर्याने विचार केला आहे. या प्रकरणात आरोपीला जामीन मंजूर केल्यास 'धोकादायक परिस्थिती' निर्माण होऊ शकते. रुग्णांवर उपचार करण्याऱ्या डॉक्टरांना संरक्षण मिळणार नाही. तसेच सार्वजनिक आरोग्य धोक्यात होईल'
या प्रकरणावर न्यायाधीश ए. बदरुद्दीन यांनी सांगितले की, निरीक्षण नमूद केले की, ' डॉक्टरांनी (Doctor) रुग्णांची तपासणी करण्यासाठी त्यांची शक्ती आणि वेळ वाया घालवलेला असतो. डॉक्टर रुग्णांना स्पर्श न करता उपचार करू शकत नाही. जर एखाद्या रुग्णाला किंवा याचिकाकर्त्याला शरीराला स्पर्श केल्यामुळे त्रास झाला असेल त्यांनी अवघड वाटून घेऊ नये'.
' स्पर्श न करताना उपचार करणे डॉक्टरांसाठी अवघड बाब आहे. डॉक्टरांना रुग्णांचे हृदयाचे ठोके तपासण्यासाठी आणि मूल्यांकन करण्यासाठी त्यांच्या छातीच्या डाव्या भागावर स्टेथोस्कोप लावावा लागतो. अशी प्रकरणं न्यायालय पूर्णपणे फेटाळू शकत नाही, असेही न्यायालयाने म्हटलं.
काय आहे प्रकरण?
मीडिया रिपोर्टनुसार, तक्रार डॉक्टरांचं म्हणणं आहे की, 'या घटनेवेळी तक्रार डॉक्टर ऑन-कॉल ड्युटीवर होते. त्यावेळी त्यांनी आरोपीच्या पत्नीची तपासणी केली. यावेळी आरोपीने डॉक्टराच्या कानाशिलात लगावली. डॉक्टरने त्याच्या पत्नीच्या अंगाला स्पर्श केल्याचा आरोप करत मारहाण केली.
या प्रकारानंतर या आरोपीवर पोलिसात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीने कोर्टात धाव घेतली. आरोपीने कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. या प्रकरणावर कोर्टाने आरोपीला जामीन नाकारला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.