KERALA IAS TRANSFER 2026 saam tv
देश विदेश

ऐन दिवाळीत 35 IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; प्रशासनात खळबळ, कोणाची कुठे नियुक्ती?

Kerala Government Transfers 35 IAS Officers: केरळ सरकारने मोठा प्रशासकीय फेरबदल करत 35 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. गृह, वित्त, ऊर्जा, आरोग्य आणि उद्योग विभागांसह अनेक महत्त्वाच्या खात्यांमध्ये नव्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

Omkar Sonawane

केरळमधील नव्या सरकारने 2 नोव्हेंबर रोजी मोठा प्रशासकीय फेरबदल केला आहे. राज्यातील तब्बल 35 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. या फेरबदलामुळे गृह, वित्त, ऊर्जा, आरोग्य आणि उद्योग यांसारख्या महत्वाच्या विभागांमध्ये मोठे बदल झाले आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांसह कनिष्ठ अधिकाऱ्यांचाही या बदल्यांमध्ये समावेश असून, अनेक अधिकाऱ्यांना नव्या जबाबदाऱ्या आणि अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.

कोणत्या अधिकाऱ्यांना कोणती जबाबदारी?

वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव असलेले वरिष्ठ IAS अधिकारी के.आर.ज्योतिलाल यांची गृह आणि दक्षता विभागात बदली करण्यात आली आहे. तसेच त्यांच्याकडे जलसंपदा, गृहनिर्माण आणि कॉयर विभागांचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. गृह आणि दक्षता विभागाची जबाबदारी सांभाळणारे मिन्हाज आलम यांची वित्त विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याकडे कर, सार्वजनिक खरेदी सल्लागार आणि रीबिल्ड केरळइनिशिएटिव्ह'ची जबाबदारीही असेल.

जलसंपदा विभागाची जबाबदारी सांभाळणारे पुनीत कुमार यांची ऊर्जा विभागाच्या पुनीत कुमार यांची ऊर्जा विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यासोबतच नवी दिल्लीतील केरळ हाऊसचे निवासी आयुक्त म्हणूनही ते काम पाहत राहतील.

मोहम्मद हनीश यांची आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याकडे आयुष, सामान्य शिक्षण, वक्फ आणि अल्पसंख्याक कल्याण विभागांचाही कार्यभार असेल.

आरोग्य विभागाच्या प्रधान सचिव शर्मिला मेरी जोसेफ यांची परिवहन विभागात बदली करण्यात आली आहे.

केंद्रीय प्रतिनियुक्तीवरून केरळमध्ये परतलेल्या एम. बीना यांची उद्योग विभागाच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

प्रशांत एन. यांची केरळ राज्य विद्युत मंडळाच्या (KSEB) अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याकडे क्रीडा आणि युवक कल्याण विभागाची जबाबदारीही कायम राहणार आहे.

केरळ राज्य विद्युत मंडळाचे प्रमुख एम. जी. राजामणिकम यांची स्थानिक स्वराज्य विभागाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या विभागाच्या सचिव अनुपमा टी. व्ही. यांची वित्त (खर्च) विभागात बदली करण्यात आली आहे.

वीणा एन. माधवन यांची कृषी सचिवपदी, तर पी. बी. नूह यांची कामगार विभागाच्या विशेष सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

या प्रशासकीय फेरबदलात इतर अनेक अधिकाऱ्यांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत. केंद्रीय प्रतिनियुक्तीवरून परतलेल्या जाफर मलिक यांची केरळ राज्य वस्तू आणि सेवा कर विभागाच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

सुभाष टी. व्ही. यांची केरळ मेडिकल सर्व्हिसेस कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यासाठी आरोग्य विभागाच्या अधिपत्याखाली ठेवण्यात आले आहे. तर रजेवरून परतल्यानंतर अफसाना परवीन या मिल्माच्या व्यवस्थापकीय संचालकपदाची जबाबदारी स्वीकारणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सचिन वाझेचा जामीन अर्ज फेटाळला

Diwali Firecracker Colours: लाल, हिरवा आणि निळा, फटाक्यांमध्ये हे रंग येतात कुठून?

Diwali 2026 : दिवाळीच्या फराळात वापरला जाणारा खवा शुद्ध की भेसळयुक्त? कसे ओळखाल

सर्वाधिक गोल करणाऱ्या 'किंग'चा फुटबॉलला अलविदा; रोनाल्डोची आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती,चाहत्यांना अश्रू अनावर

MSRTC Employees diwali bonus 2026 : एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी जोरात; एकाच वेळी बोनस, अॅडव्हान्स आणि महागाई भत्त्याची घोषणा

SCROLL FOR NEXT