Fire Crackers Factory Blast  PTI
देश विदेश

Kerala Blast : फटाका फॅक्टरीमध्ये स्फोट; २५ घरांचे नुकसान; १६ जण जखमी

Fire Crackers Factory Blast : केरळमधील त्रिपुनिथुरा येथील रहिवाशी भागात असलेल्या फटाका फॅक्टरीमध्ये स्फोट झालाय. यात १६ जण जखमी झाले आहे तर १ जणाचा मृत्यू झालाय. या स्फोटामुळे अनेक घरांचे नुकसान झालंय.

Bharat Jadhav

Kerala Fire Crackers Factory Warehouse Blast :

केरळमधील एका फटाक्यांच्या फॅक्टरीमध्ये स्फोट झाल्याची घटना घडलीय. यात १६ जण जखमी झाले असून यात महिला आणि मुलांचा समावेश आहे. तर एकाच मृत्यू झाल्याची माहिती हाती आलीय. फटाका फॅक्टरीमध्ये स्फोट होण्याची घटना केरळमधील त्रिपुनिथुरा येथील रहिवाशी भागात झालीय. यात एकाचा मृत्यू झाला असून ४ जण गंभीर जखमी झाले असून त्यांना जवळील कलामासेरी मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आल्याचे माहिती न्यूज २४ या वृत्तसंस्थेने दिलीय.(Latest News)

जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीची ओळख पटली असून त्याचे नाव विष्णू असून तो तिरुवनंतपुरम येथील राहणारा असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान फटाका फॅक्टरीत झालेला स्फोट इतका भीषण होता की, या फॅक्टरीच्या आसपासची २५ घरे जमिनदोस्त झालीत. त जोन दोन वाहने जळून खाक झाली आहेत. दरम्यान फॅक्टरीमध्ये स्फोट कशामुळे झाला याचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. पोलीस आणि अग्रिशमन दलाची तुकडी घटनास्थळी दाखल झालीय. पोलिसांनी जखमी झालेल्या व्यक्तींना रुग्णालयात दाखल केलंय.

 (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, फटाका फॅक्टरीमध्ये झालेला स्फोट भीषण होता. स्फोटाचे धक्के अनेक किलोमीटरपर्यंत जाणवल्याची माहिती अग्मिमन दलाच्या अधिकाऱ्याने दिलीय. स्फोट झाल्यानंतर आगीने भडका घेतला होता, परंतु अग्निशमन दलाच्या जवानांनी आग शमवली आहे. दरम्यान फटाका फॅक्टरी अवैध पद्धतीने चालवण्यात येत होते, याची माहिती पोलिसांनी देखील नव्हती.

एका वाहनातून फटाके गोदामात उतरवले जात होते त्याचवेळी स्फोट झाला. कोणीतरी बिडी किंवा सिगारेट पीत असावं आणि त्याने जळती सिगारेट किंवा बि़डी तशीच फेकून दिली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय. फटका फॅक्टरीत स्फोट झाल्याने परिसरातील घरांचे नुकसान झाले आहे. अनेक घरांच्या खिडक्या आणि दरवाजे खिळखिळे झाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक; काँग्रेसकडून उमेदवारांची यादी जाहीर, कोणाला मिळाली संधी?

विधानसभा निवडणुकांआधी २ राज्यांत मोठा उलटफेर; काँग्रेसनं मोक्याच्या क्षणी मारला चौका

Maharashtra Politics : भाजप, शरद पवार गटाला मोठा धक्का; माजी मंत्री नाईकांच्या नातीसह शेकडो कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

पूर्णेकर हत्येवरून ठाकरे-शिंदे संघर्ष टोकाला, नाईकांनी करावं ठाण्याचं नेतृत्व ' राऊतांनी शिंदेंना डिवचलं

Maharashtra News Live Update: आठवे ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ मंदिर दर्शनासाठी एक महिना बंद

SCROLL FOR NEXT