Kerala Ernakulam accident involving a minor driving a luxury car saam tv
देश विदेश

न्यायाधीशांच्या अल्पवयीन मुलाच्या आलिशान कारची दुचाकीला धडक; बाईकस्वाराचा जागीच मृत्यू

Kerala Judge Minor Son Luxury Car Accident Scooter Rider Death: केरळच्या एर्नाकुलममध्ये १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने चालवलेल्या कारची स्कूटरला धडक बसल्याने जयाबालकृष्णन यांचा मृत्यू झाला.

Omkar Sonawane

केरळच्या एर्नाकुलम जिल्हयात रविवारी पहाटे एका अल्पवयीन मुलाने चालवलेल्या कारची दुचाकीला धडक बसल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला. मृत व्यक्ती जयाबालकृष्णन हे चेरानल्लूर परिसरातील साऊथ चित्तूर येथील रहिवासी होते. ते स्वतःचे छोटे दुकान बंद करून घरी परतत असताना हा अपघात झाला. या प्रकरणातील 17 वर्षीय आरोपी हा जिल्हा न्यायाधीशांचा मुलगा असल्याने प्रकरण चर्चेत आले आहे.

ही दुर्घटना चेरानल्लूर येथील कंटेनर रोडवर मारापरंबू परिसरातील फोर्ड शोरूमजवळ पहाटे सुमारे 2.20 वाजता घडली. पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, संबंधित अल्पवयीन मुलगा आई-वडिलांना न सांगता त्यांच्या नावावर असलेली कार घेऊन बाहेर पडला होता. कारमध्ये तो एकटाच होता. वल्लारपदम येथून कलामासेमारीच्या दिशेने जात असताना त्याच्या कारची त्याच दिशेने जाणाऱ्या स्कूटरला धडक बसली. या अपघातात स्कूटरवर चालवत असलेल्या जयाबालकृष्णन यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणी चेरानल्लूर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १०६(१) आणि २८१ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ही कलमे निष्काळजीपणामुळे मृत्यू होणे आणि निष्काळजीपणे वाहन चालवण्याशी संबंधित आहेत. पोलिसांनी १७ वर्षीय मुलाला ताब्यात घेतले आहे. त्याचे वडील त्रिशूर जिल्ह्यात अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश म्हणून कार्यरत आहेत.

अपघातानंतर मृत जयाबालकृष्णन यांच्या कुटुंबीयांनी न्यायाधीश वडिलांवर प्रकरणात हस्तक्षेप केल्याचा आरोप केला आहे. संबंधित मुलाकडे ड्रायव्हिंग लायसन्स नसल्याचा दावाही कुटुंबीयांनी केला आहे. मृताची नातेवाईक जयालक्ष्मी यांनी आरोप केला की, अपघातानंतर न्यायाधीश पोलीस ठाण्यात पोहोचले. अल्पवयीन मुलाला कार चालवण्यास परवानगी नसल्याच्या कायद्याबाबत त्यांना विचारणा केली असता ते संतापले. ‘आम्हाला कायदा शिकवू नका’ अशा आशयाचे उत्तर त्यांनी दिल्याचा दावा जयालक्ष्मी यांनी केला.

तसेच, पोलिसांनी पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने अपघातातील कार तातडीने घटनास्थळावरून हटवल्याचा आरोपही कुटुंबीयांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : पत्नीला खाऊ घातले ब्लेडचे तुकडे, पतीला न्यायालयाने सुनावली कठोर शिक्षा

Maharashtra News Live Update: कर्जतच्या टोरंट प्रकल्पाविरोधात शेकाप आक्रमक; वृक्षतोड थांबवण्याची मागणी

Itchy ears after bathing: आंघोळीनंतर तुमच्याही कानात सतत खाज येते? दुर्लक्ष करू नका, डॉक्टरांनी सांगितलं कारण

Home Cleaning Tips: दिवाळीसाठी घराची साफसफाई करायची आहे? मग, वेळ आणि मेहनत वाचवणाऱ्या ७ सोप्या टिप्स नकी फॉलो करा

३-४ महिन्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील, गणेश नाईकांच्या विधानाचा नेमका अर्थ काय?

SCROLL FOR NEXT