Kerala Boat Accident Saam Tv
देश विदेश

Kerala Boat Accident Update: केरळमधील बोट दुर्घटनेतील मृतांचा आकडा 22 वर, PM मोदींना दु:ख

Keral Latest News: या दुर्घटनेतील (Kerala Boat Accident) मृतांचा आकडा वाढत चालला आहे. आतापर्यंत 22 जणांचा मृत्यू झाला आहे.

Priya More

Kerala News: केरळमध्ये (Keral) रविवारी बोट उलटून मोठी दुर्घटना घडली होती. केरळच्या मलप्पुरम जिल्ह्यातील तनूरजवळ पर्यटक बोट उलटली होती. या दुर्घटनेतील (Kerala Boat Accident) मृतांचा आकडा वाढत चालला आहे. आतापर्यंत 22 जणांचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळी शोधकार्य युद्धपातळीवर सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) दु:ख व्यक्त करत मदत जाहीर केली.

केरळच्या मलप्पुरममधील तनूर येथील तुवाल्थीराम समुद्रकिनाऱ्याजवळ रविवारी संध्याकाळी बोट उलटल्याची घटना घडली होती. या पर्यटक बोटीमधून 50 जण प्रवास करत होते. अचानक ही बोट उलटली आणि सर्व प्रवासी समुद्रात पडले. ही घटना घडली त्यावेळी 9 जणांचा मृत्यू झाला होता. आता मृतांचा आकडा वाढला असून आतापर्यंत 22 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर 7 जणांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

या दुर्घटनेतील मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी शोधमोहीम सुरु आहे. या घटनेप्रकरणी बोटीच्या मालकाविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना घडली त्यावेळी संध्याकाळचे सात वाजले होते. सूर्यास्तानंतर बोटीच्या प्रवासावर बंदी असताना देखील ही बोट चालवण्यात आली होती. तसंच या बोटीमध्ये प्रमाणापेक्षा जास्त प्रवाशांना बसवण्यात आले होते. या बोटीला सुरक्षा प्रमाणपत्रही नव्हते. तसंच प्रवाशांना सुरक्षाकवचही देण्यात आले नसल्याची बाब पोलिस तपासातून समोर आली आहे.

दरम्यान, या बोट दुर्घटनेप्रकरणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी ट्वीट करत या घटनेप्रकरणी आपल्या संवेदना व्यक्त केल्या आहेत. नरेंद्र मोदींनी या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News: खडकवासल्यातून पाण्याचा विसर्ग; पुण्यातील टिळक पूल वाहतुकीसाठी बंद

Parliament: अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल, लोकसभेत नेमकं काय घडलं?

Online Gaming Ban Bill : ऑनलाइन गेम खेळणं बंद होणार? केंद्राचं विधेयक, ऑनलाईन गेम 'ओव्हर'

BEST Election: ठाकरे बंधूंच्या हाती भोपळा, BMC च्या लिटमस टेस्टमध्ये ठाकरे फेल

Brain Health: तल्लख बुद्धी हवी? तर मेंदूच्या आरोग्यासाठी आजच सोडा 'या' वाईट सवयी

SCROLL FOR NEXT