Kenya Dam Burst Saam TV
देश विदेश

Kenya Dam Burst : केनियामध्ये मोठी दुर्घटना; धरण फुटल्याने ३५ जणांचा मृत्यू, रात्री गाढ झोपेतच नागरिक वाहून गेले

Kenya Dam Burst 35 People Killed : अतिवृष्टी झाल्याने येथील एक धरण फुटले आहे. यामध्ये जवळपास ३५ व्यक्तींनी आपला जीव गमावला आहे. तर अनेक व्यक्ती अद्यापही बेपत्ता आहेत.

Ruchika Jadhav

केनियामध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. अतिवृष्टी झाल्याने येथील एक धरण फुटले आहे. यामध्ये जवळपास ३५ व्यक्तींनी आपला जीव गमावलाय. तर अनेक व्यक्ती अद्यापही बेपत्ता आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली आहे. बचावपथक घटनास्थळी दाखल झाले असून नागरिकांना रेस्क्यू करण्याचे काम सुरू आहे.

मिळालेल्या अधिक महितीनुसार, राजधानी नैरोबीपासून 60km अंतरावर असलेल्या माई महियू गावात ही घटना घडली आहे. रात्री नागरिक झोपेत असताना धरण फुटले. त्यामुळे अनेक जण झोपेतच वाहून गेले आहेत. संपूर्ण गावात चिखल आणि गाळ साचला आहे. यामुळे बचावकार्य सुरू असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

केनियामध्ये धरण फुटल्याने यामध्ये संपूर्ण गाव पाण्याखाली गेलं आहे. अनेकांची घरं देखील वाहून गेली आहेत. गावात सध्या पाहिलं तर पूरसदृश्य परिस्थिती असून ठिकठिकाणी मोडलेली घरं,झाडं आणि सर्वत्र चिखल पसरल्याचं दिसत आहे. नागरिक आपल्या जवळच्या व्यक्तींना शोधण्यासाठी कासावीस झाले आहेत.

केनियामध्ये मुसळधार पाऊस झाल्याने रस्त्याचा काही भाग देखील खचला आहे. त्यामुळे बचाव पथकाला गावात प्रवेश करण्याआधी खचलेल्या रस्त्यातून वाट काढावी लागत आहे. मार्च महिन्याच्या सुरवातीपासूनच या गावामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिला तर आणखी भीषण परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

महिनाभरात १०० नागरिकांचा मृत्यू

केनियामध्ये पावसाने मोठा हाहाकार माजला आहे. महिनाभरापासून सुरू असलेल्या पावसाने अनेक ठिकाणी पूर आला आहे. पुरामध्ये आतापर्यंत वेगवेगळ्या गावांतील १०० व्यक्तींचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. येथे पुढचे काही दिवस आणखी मुसळधार पाऊस बरसणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Causes of high blood sugar: फक्त साखर खाल्यानेच ब्लड शुगर वाढत नाही, तज्ज्ञांनी दिली सर्वांच्या मनातील प्रश्नाचं उत्तर

India Tourism : चेरापुंजी नाही तर 'या' ठिकाणी पडतो सर्वाधिक पाऊस

Ladki Bahin Yojana: मराठवाड्यातील सव्वा लाख लाडक्या बहिणींना धक्का, यापुढे खात्यात येणार नाहीत पैसे, नेमकं कारण काय?

Maharashtra Live News Update: सोलापूर काँग्रेसच्या माजी आमदार निर्मला ठोकळ यांचे निधन

PM Modi Salary: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पगार किती? घर कुठे? कोणत्या सुविधा मिळतात? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT