देश विदेश

KCR Daughter Kavitha: केसीआर यांची मुलगी के. कविता यांना ईडीने घेतलं ताब्यात

Delhi Liquor Scam: अंमलबजावणी संचालनालयाने के. कविता यांच्या निवासस्थानावर छापा टाकला. दिल्लीच्या महसूल धोरणाच्या कथित घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आलीय. यानंतर ईडीने कविता यांना ताब्यात घेतलं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

(प्रमोद जगताप, नवी दिल्ली)

Delhi Liquor Scam KCR Daughter Kavitha:

दिल्ली दारू घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची मुलगी के. कविता यांना ताब्यात घेतलंय. त्यांना तेलंगणातून दिल्लीत आणले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ईडीने यापूर्वी कविता यांच्या निवासस्थानासह इतर ठिकाणी ईडीने छापेमारी केली. ED ने कविता यांच्या हैदराबाद येथील निवासस्थानी आणि इतर ठिकाणी छापे टाकले. ईडीकडून करण्यात आलेली ही कारवाई दिल्ली सरकारच्या पूर्वीच्या उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित कथित हवाला व्यवहाराच्या प्रकरणात करण्यात आलीय.(Latest News)

तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांची मुलगी के. कविता यांच्याविरोधात दिल्लीच्या कथित दारू घोटाळ्या प्रकरणी २ खटला करण्यात आले आहेत. भ्रष्टाचाराशी संबंधित प्रकरणाची चौकशी सीबीआयकडून करण्यात येत आहे. हवालाद्वारे पैशांच्या व्यवहाराच्या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने मनी लाँडरिंग कायद्यांतर्गत तपास करत आहे. केसीआर यांची मुलगी कविताचे दक्षिण भारतातील दारू व्यापाऱ्यांच्या लॉबीशी हितसंबंध होते.

२०२१-२२ च्या दिल्ली उत्पादन शुल्क धोरणात त्यांची मोठी भूमिका होती. दिल्ली उत्पादन शुल्क धोरणांतर्गत मोठा बाजार हिस्सा मिळविण्यासाठी AAP ला सुमारे १०० कोटी रुपयांची लाच कविता यांनी दिले होतं. के कविता या कथित मद्यविक्रेत्यांच्या 'साउथ ग्रुप' चे प्रतिनिधित्व करत होते असा दावा ईडीने केलाय. दरम्यान दिल्लीचे हे धोरण रद्द करण्यात आले आहे.

दरम्यान सुप्रीम कोर्टाकडून कविता यांना आज याप्रकरणात दिलासा दिला होता. ईडीने २० मार्चपर्यंत कविता यांना चौकशी नोटीस पाठवू नये, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले होते. याचबरोबर न्यायालयाने त्यांना अटकेपासून दिलासा दिला होता. आज ईडीने कविता यांच्या निवासस्थानी छापे टाकले त्यानंतर त्यांना ताब्यात घेत दिल्लीला नेण्यात येत आहे. ईडीनुसार साऊथ ग्रुप मध्ये सरत रेड्डी, मगुंटा श्रीनिवासुलू रेड्डी ( आंध्र प्रदेशमध्ये ओंगोलचे वायएसआर काँग्रेस खासदार आहेत.) त्यांचा मुलगा राघव मगुंटा, कविता आणि इतर नेत्यांचा या प्रकरणात समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Result : मुंबई कुणाची? ठाकरे, भाजप, शिंदे कुणाचा कोणत्या मतदारसंघात उमेदवार विजयी?

Broccoli Dishes: हिवाळ्यात सुपरफुड पेक्षा कमी नाही 'ब्रोकोली', आहारात समावेश करून पाहा

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: कर्जत-जामखेडमधून रोहित पवार विजयी

Ajaz Khan : सोशल मीडियावर हवा; मात्र राजकारणात डब्बागुल,'बिग बॉस' फेम अभिनेत्याचा दारूण पराभव

Tourist Spots: भारतातील सर्वाधिक भेट दिलेले 'ही' ५ पर्यटन स्थळ

SCROLL FOR NEXT