nephew killed maternal uncle due to love affair dispute Saam Tv News
देश विदेश

Crime News : मामीच्या बहिणीवर लट्टू झाला, घरातून दोनवेळा तिला नेऊन पळाला, प्रेमामध्ये मामा आडवा आला; अन्...

Nephew Kills Uncle : उत्तर प्रदेशातील कौशाम्बी जिल्ह्यातील संदीपन घाट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिकंदरपूर बजहा गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. शुक्रवारी एका झाडाखाली रक्ताच्या थारोळ्यात एक मृतदेह आढळल्यानं एकच खळबळ उडाली.

Prashant Patil

कौशाम्बी : मेरठमधील सौरभ हत्याकांडानंतर प्रेमप्रकरणातील हत्याकांडांचा अक्षरश: पूर आला आहे. अशीच एक घटना कौशाम्बी येथे घडली आहे. मामीच्या बहिणीच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या भाच्याने थेट मामाचीच हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हे कृत्य करण्यासाठी त्याला त्याच्या चुलत भावाने आणि मित्राने मदत केल्याची माहितीही समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. या घटनेमुळे कौशांबी जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

उत्तर प्रदेशातील कौशाम्बी जिल्ह्यातील संदीपन घाट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिकंदरपूर बजहा गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. शुक्रवारी एका झाडाखाली रक्ताच्या थारोळ्यात एक मृतदेह आढळल्यानं एकच खळबळ उडाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला. मृत व्यक्ती २८ वर्षाचा असून महेंद्र प्रजापती ऊर्फ छोटू असं त्याचं नाव आहे. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे.

पिकअप वाहनावरुन ओळख पटली

मृतदेहाशेजारी एक पिकअप वाहन होतं. त्यावरील नंबरवरून मृतदेहाची ओळख पटवण्यात आली आहे. त्यानंतर सर्व्हिलान्सच्या मदतीने पोलिसांनी मोबाईल लोकेशन आणि कॉल डिटेल्स काढली. त्यात तिघांवर संशय बळावला. पोलिसांनी महेंद्रच्या कुटुंबीयांची चौकशी केली. त्यावेळी आकाश, रोहित आणि छोटू ऊर्फ विजय भारतीय या तीन तरुणांवर पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी तातडीने चक्र फिरवून तिघांनाही मनौरी पुलिया या ठिकाणी जेरबंद केलं.

त्यानंतर पोलिसांनी या तिघांची कसून चौकशी केली. यावेळी आरोपी आकाशने दिलेल्या कबुलीने सर्वच हादरून गेले. मृतक छोटू ऊर्फ महेंद्र त्याचा मामा असल्याचं त्यानं सांगितलं. 'माझं मामीच्या बहिणीवर प्रचंड प्रेम होतं. यापूर्वी दोनदा तिला घेऊन पळून गेलो होतो. त्यामुळे कुटुंबात तणाव निर्माण झाला होता. नातेवाईकांनी पंचायत बोलवून प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी मामाने मला प्रचंड झापलं होतं. तसेच सर्वांसमोर माझा अपमान केला होता. त्यामुळेच मामाच्या विरोधात माझ्या मनात सूडाची भावना होती', असं आकाशने पोलिसांना सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Driving Licence: आता घरबसल्या करा मिळवा ड्रायव्हिंग लायसन्स, जाणून घ्या संपूर्ण ऑनलाइन प्रक्रिया

Heavy Rain : मुसळधार पाऊस; वारणा धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग, कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ

Kumbh Rashi : कुंभ राशीचा आजचा रविवार जाणार कसा? वाचा स्पेशल राशीभविष्य

Rohini Khadse: कोण आहे रोहिणी खडसे? जाणून घ्या त्यांच्याविषयी

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा - नितेश राणे

SCROLL FOR NEXT