Karnataka Crime Saam Tv News
देश विदेश

Son kills father: वडिलांचा ३० लाखांचा विमा, मुलाच्या डोक्यात राक्षस शिरला; हत्या केली, 'असा' झाला बनाव उघड

Karnataka Crime News: विम्याच्या पैशांसाठी मुलानं वडिलांची हत्या केलीय. ही धक्कादायक घटना कर्नाटकातील कलबुर्गी येथे घडली असून, हीट अँड रनचा बनाव रचत वडिलांची हत्या करणाऱ्या आरोपी मुलाला बेड्या ठोकल्या आहेत.

Bhagyashree Kamble

पैशांच्या लोभापायी अनेकजण विविध प्रकारचे गुन्हे करतात. मात्र, कर्नाटकात विम्याच्या पैशांसाठी आरोपी मुलानं आपल्या वडिलांची हत्या केली आहे. ही धक्कादायक घटना कर्नाटकातील कलबुर्गी येथे घडली असून, हीट अँड रनचा बनाव रचत वडिलांची हत्या करणाऱ्या आरोपी मुलाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तसेच याप्रकरणात तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

कर्नाटकातील कलबुर्गी येथे एका नराधम मुलाने आपल्याच वडिलांच्या हत्येचा कट रचत त्यांना ठार केलंय. कलिंगराया असे वडिलांचे नाव असून, सतीश असे आरोपी मुलाचे नाव आहे. हे प्रकरण ६ महिन्यांपूर्वी घडली होती. सुरूवातीला हे प्रकरण हिट अँड रन असल्याचं तपासात उघड झालं होतं. सतीशने मदबूल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. अज्ञात वाहनाने धडक दिल्यानं वडिलांचा मृत्यू झाला असल्याची माहिती त्यानं दिली. मात्र, अधिक तपास केला असता, विम्याच्या पैशांसाठी मुलानेच वडिलांच्या हत्येचा प्लॅन आखला असल्याची माहिती समोर आलीय.

या प्रकरणाबाबत पोलिस अधिक्षक म्हणाले, 'तपासासाठी पोलीस टीमने सतीशला बोलावून घेतलं. मात्र, अनेकदा तो यायचा नाही. सतीशने दिलेला जबाब आणि अपघातस्थळ पोलिसांना संशयास्पद आढळल्याने, पोलिसांनी अरूणला ताब्यात घेतलं. नंतर त्याची चौकशी केली असता, त्याने संपूर्ण हत्येचा कट उघडकीस आणला'.

हत्येचा कट उघडकीस

सतीशने सांगितले की, अरूण, राकेश आणि युवराज यांना त्याच्या वडिलांच्या हत्येसाठी तयार केले होते. त्यांना यासाठी ५ लाखांची ऑफर देखील देण्यात आली होती. गतवर्षीच्या जुलै महिन्यात सतीश वडिलांना कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने दुचाकीवरून घेऊन गेला. प्लॅननुसार, ट्रॅक्टर आला आणि ट्रॅक्टरने कलिंगराया यांच्या दुचाकीला धडक दिली, ज्यात कलिंगराया चिरडले गेले आणि सतीश गंभीर जखमी झाला. धडक दिल्यानंतर ट्रॅक्टरने तेथून पळ काढला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सतिश हा आदर्श नगरमध्ये हॉटेल चालवत होता. मात्र, हॉटेल व्यवसाय योग्यरित्या न चालवता आल्याने प्रचंड कर्जबाजारी झाला होता. कर्ज फेडण्यासाठी त्याच्यावर दबाव होता. यानंतर हॉटेलमध्ये काम करणाऱ्या अरूणने सतीशला वडिलांची हत्या करून विम्याचे पैसे उकळण्याच्या प्लॅनबद्दल सांगितलं. नंतर एकूण ३० लाखांच्या विम्यासाठी त्याने प्लॅन आखत वडिलांना संपवलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Andheri News : मुंबईत रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग माफियांची मुजोरी; रेल्वेच्या नियमांना हरताळ, नागरिकांची सर्रास लूट

कोचिंग क्लासची पिकनिक जीवघेणी ठरली, रायगडमध्ये समुद्रात अकोल्यातील शिक्षकासह विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

2026 मध्ये सोनं आणखी महागणार? महायुद्धानंतर शक्तिशाली नेता उदयास येणार?

Maharashtra Politics: शिवसेना भाजप संबंध तुटणार? ठाकरे- शिंदेंच्या युतीवर राणे आक्रमक

Sunday Horoscope : नातेवाईकांकडून लाभ मिळणार; 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, अफाट पैसा येणार

SCROLL FOR NEXT