Beed Crime: बीडमध्ये गुंडाराज? अंबाजोगाईमधील शेतात आढळला २५ वर्षीय तरुणाचा मृतदेह

Beed crime 25-Year-Old Man Found Dead: बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईत एका तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडालीय. हा घात आहे की अपघात ? याचा तपास आता अंबाजोगाई पोलीस करत आहेत. या तरुणाचं वय २५ वर्ष असल्याचं सांगितलं जात आहे.
Beed Crime
Beed crime 25-Year-Old Man Found DeadSaam Tv
Published On

सरपंच अपहण आणि हत्या प्रकरणाने बीड जिल्ह्यातील गुंडगिरीची चर्चा राज्यभरात होत आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरण ताजे असतानाचा बीडच्या अंबाजोगाईत एक तरुणाचा मृतदेह आढळून आलाय. शहरातील मुकुंदराज रोडवरील एका शेतात तरुणाचा मृतदेह आढळलाय. यामुळे खळबळ उडालीय. मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी पंचनामा करत तपास सुरू केलाय.

मृतदेह आढळून आलेल्या तरुणाचं वय २५ वर्ष असल्याचं सांगितलं जात आहे. अंबाजोगाईतील मुकुंदराज रोडवरील गवळी यांच्या शेतात मृतदेह आढळलाय. मयत तरुणाच्या चेहऱ्यावर जखमा असल्याचं समोर आले आहे. शौकत अली मेहराज अली सय्यद वय २५ रा. बीड असं मयत तरुणाचे नाव आहे. तर घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केलाय. त्यानंतर सदरील मृतदेह शवविच्छेदनासाठी अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आलाय. दरम्यान हा घात आहे की अपघात ? याचा तपास आता अंबाजोगाई पोलीस करत आहेत.

Beed Crime
Hingoli Crime : वाळू माफियांची मुजोरी वाढली; महसूल अधिकाऱ्याला थेट डंपरखाली चिरडण्याचा प्रयत्न

बीडमधील मस्साजोग येथील माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानं संपूर्ण राज्य हादरलं. यानंतर बीडमधील गुन्ह्यांचा आढावा घेण्यात आला. याच पार्श्वभूमीवर मागील ११ महिन्यांचा गुन्ह्याचा आढावा घेण्यात आलाय. गुन्हेगारांची आकडेवारी पाहता २०२३ पेक्षा २०२४ साली गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. प्रत्येक आठवड्याला एकाची हत्या होत असून, २ दिवसाला एकावर जीवघेणा हल्ला, हत्येचा प्रयत्न करण्याची नोंद करण्यात आलीय.

Beed Crime
Pune Crime News: पुण्यातील शुभदा कोदारेची हत्या का झाली? तपासात समोर आलं धक्कादायक कारण

२०२३ च्या तुलनेत २०२४ मध्ये १ हजार १४७ गुन्ह्यांच्या संख्येत वाढ झालीय. या सर्व परिस्थितीवरून जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. २०२४ या वर्षात ४० हत्या झाल्याची नोंद बीडमध्ये झालीय. डिसेंबर अखेरीस मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची ज्या प्रकारे हत्या झाली, त्याने तर बीडच नव्हे तर महाराष्ट्र हादरलाय. मात्र त्यानंतर सुद्धा बीड जिल्ह्यातील गु्न्हेगारी कमी झाल्याचं चित्र तरुणाचा मृतदेह आढळल्यानंतर दिसून येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com