Karnataka News  Saam tv
देश विदेश

Karnataka News : पोलिसांच्या ताब्यातील तरुणाचा मृत्यू; भडकलेल्या जमावाचा पोलीस स्टेशनवर हल्ला, ११ पोलीस जखमी

people attack on police : कर्नाटकातील चन्नागिरीमधील आदिल नावाचा व्यक्तीचा पोलीस ठाण्यात संशयास्पद मृत्यू झाला. या घटनेनंतर त्याचे नातेवाईक आणि परिसरातील लोकांनी पोलीस स्टेशनजवळ राडा केला. तसेच पोलिसांवर गंभीर आरोप केले.

Vishal Gangurde

कर्नाटक : कर्नाटकातील दावणगेरे जिल्ह्यातील चन्नागिरीमधील आदिल नावाचा व्यक्तीचा पोलीस ठाण्यात संशयास्पद मृत्यू झाला. या घटनेनंतर त्याचे नातेवाईक आणि त्याच्या परिसरातील लोक भडकले. या भडकलेल्या जमावाने पोलीस स्थानकावर दगडफेक करत आग लावली. शनिवारी ही घटना घडली. या घटनेत ११ पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

कर्नाटकातील दावणगेरे जिल्ह्यातील आदिलच्या मृत्यूची वार्ता पसरल्यानंतर नातेवाईक आणि इतर लोक पोलीस स्टेशनजवळ जाऊन राडा केला. या जमावाने पोलिसांच्या वाहनांचं नुकसान केलं. तसेच दगडफेक केली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज देखील केला.

आदिलच्या नातेवाईकांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. पोलिसांनी छळ केल्याने आदिलचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे. आदिलच्या मृत्यूनंतर त्याचा मृतदेह सरकारी रुग्णालयात पाठविण्यात आला. त्यानंतर शवविच्छेदनानंतर त्याच्या कुटुंबाकडे सोपवण्यात येईल.

पोलिसांकडून परिसरात नाकेबंदी सुरु आहे. आदिलच्या मृतदेहाचा पोस्टमार्टम हा मॅजिस्ट्रेटच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. पोलिसांनी नातेवाईकांनी केलेले आरोप फेटाळले आहेत. त्याच्या शरिरावर कोणतेही जखमेचे निशाण नाही. पोलिसांचा दावा आहे की, आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर ७ मिनिटात त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याला रुग्णालयात नेलं, डॉक्टरांनी उच्च रक्तदाबामुळे आरोपीचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

नेमकं काय घडलं?

पोलीस अधीक्षक उमा प्रशांत यांनी सांगितलं की, 'काल आदिल नावाचा व्यक्तीला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणलं. त्यानंतर तो बेशुद्ध झाला. त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल केलं. आदिल पोलीस स्टेशनमध्ये सहा ते ७ मिनिटे देखील नव्हता. लोक पोलिसांवर आरोप करत आहेत. पोलीस स्टेशनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. मृताच्या वडिलांची तक्रार नोंदविण्यात आली आहे. न्यायाधीशांच्या उपस्थितीत पोस्टमार्टम करण्यात येईल. पोलीस ठाण्यावर केलेल्या हल्ल्यात ११ पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. तर ७ वाहनांचं नुकसान झालं आहे. या प्रकरणी ३ एफआयआर नोंदविण्यात आले आहेत'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT