Karnataka school reopen saam news
देश विदेश

Karnataka: कर्नाटकातील शाळा, महाविद्यालय सुरु; हिजाबवरुन पालक, शिक्षकांत वाद

आज शाळा आणि महाविद्यालय सुरु झालेत.

साम न्यूज नेटवर्क

कर्नाटक : शाळा आणि महाविद्यालयांमध्ये हिजाब परिधान करण्यावरुन गेल्या काही दिवसांपासून कर्नाटक राज्यात माेठा गाेंधळ निर्माण झाला. एका महाविद्यालयात हिजाब (hijab) परिधान करुन आलेल्या विद्यार्थीनीस हिंदुत्ववादी संघटनांच्या आंदाेलक विद्यार्थ्यांनी हिजाब वरुन हटकलं. त्यानंतर युवतीने महाविद्यालयात आक्रमक पवित्रा घेत त्यांना प्रखर विराेध केला. दरम्यान हिजाब (hijab) वरुन कर्नाटक (karnataka) सरकारने येथील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न चिघळू नये या पार्श्वभूमीवर बंद ठेवलेल्या शाळा आणि महाविद्यालय आज खूली झाली आहेत. (karanataka school reopens today after hijab row)

आज बहुतांश शाळा आणि महाविद्यालयात विद्यार्थींनी जाताहेत. या दरम्यान अनेकांना शाळेच्या आवाराच्या बाहेर हिजाब घालून परिसरात प्रवेश करु नये असं शाळा (karnatak school) प्रशासनाच्यावतीने सांगतिलं जात आहे. बहुतांश शाळांमध्ये मुलींनी हिजाब परिधान करताच प्रवेश केला आहे.

मंड्यातील रोटरी स्कूलच्या बाहेर पालक आणि शिक्षक यांच्यात हिजाब परिधान केलेल्या मुलीवरुन वाद झाला. विद्यार्थ्यांना शाळा परिसरात प्रवेश करण्यापूर्वी हिजाब काढण्यास सांगितल्याने पालकांनी वाद घातला. परंतु शाळा प्रशासनाने न्यायालयाचे निर्देश पाळावेत असं नमूद केले. त्यावर पालकाने विद्यार्थ्यांना वर्गात जाण्यापूरता तरी हिजाब परिधान करुन द्यावे अशी मागणी केले. परंतु शिक्षकांनी ती अमान्य केली.

Edited By : Siddharth Latkar

दरम्यान उडुपीचे तहसिलदार म्हणाले विद्यार्थी शाळेत येत आहेत. परिस्थिती शांततापूर्ण आहे आणि जिल्हा प्रशासन उच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन करत आहे. उडुपी जिल्ह्यात १९ फेब्रुवारी पर्यंत कलम १४४ लागू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Politics : एकनाथ शिंदे अचानक दिल्लीत; दीड तास PM मोदींसोबत बैठक; काय झाली चर्चा?

Maharashtra Live News Update: २८ ऑक्टोबरपर्यंत प्रशांत बनकरला पोलीस कोठडी

Rohit Sharma: निवृत्तीच्या चर्चेदरम्यान रोहितचं वादळ; ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना धुतलं, झळकावलं ३३ वं शतक

वर्ल्डकप स्पर्धेसाठी भारतात आलेल्या २ ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटूंचा विनयभंग, आरोपीच्या मुसक्या आवळल्या

Heart Blockage Symptoms: छातीत सतत जळजळ होतेय? अ‍ॅसिडीटी नाही, तर रक्तवाहिन्या ब्लॉकेजचा धोका, वाचा लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT