Karnataka political Saam tv
देश विदेश

कर्नाटकात भाकरी फिरणार; शिवकुमार मुख्यमंत्री होणार, बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

Karnataka political news : कर्नाटकात भाकरी फिरण्याची शक्यता आहे. कर्नाटकात शिवकुमार मुख्यमंत्री होणार असल्याचा आमदाराच्या दाव्याने खळबळ उडाली आहे.

Vishal Gangurde

काँग्रेस आमदार इकबाल हुसैन यांनी डीके शिवकुमार मुख्यमंत्री होणार असल्याचा दावा

६ किंवा ९ जानेवारी रोजी सत्ताबदल होण्याची शक्यता आमदाराने दावा केला आहे

भाजप नेत्यांकडून गृहमंत्री परमेश्वर यांना पाठिंबा केला आहे

काँग्रेसमधील अंतर्गत राजकारण पुन्हा चर्चेत आलं आहे

कर्नाटकात सत्ताधारी काँग्रेस आमदाराच्या दाव्याने खळबळ उडाली आहे. कर्नाटकातील उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार हे ६ जानेवारी रोजी मुख्यमंत्री होतील, असा दावा काँग्रेस आमदार इकबाल हुसैन यांनी केली आहे. सिद्धारमैया यांनी शिवकुमार यांच्यासाठी मुख्यमंत्रिपद रिक्त करायला हवं. 'ते सहा जानेवारी रोजी मुख्यमंत्री होण्याची ९९ टक्के शक्यता आहे, असा दावा शिवकुमार यांनी केला आहे.

शिवकुमार यांच्या कट्टर समर्थकांनी सांगितलं की, 'शिवकुमार ६ किंवा ९ जानेवारी होण्याची शक्यता आहे. या दोन्ही तारीख आहे'. हुसैन यांची गेल्या अनेक दिवसांपासून शिवकुमार यांना मुख्यमंत्री करण्याची मागणी आहे. त्यांनी शुक्रवारी देखील मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. रेल्वे राज्यमंत्री आणि भाजप खासदार वी सोमन्ना यांनी म्हटलं की, 'मुख्यमंत्रि‍पदासाठी गृहमंत्री परमेश्वर यांना समर्थन आहे'.

सोमन्ना यांनी तुमकुरुमध्ये एका कार्यक्रमात म्हटलं की, 'सत्ता मिळणे भाग्याची गोष्ट आहे. मी कधीही स्वप्नात विचार केला नसेल की, परमेश्वर फक्त गृहमंत्री म्हणूनच राहतील. मी त्यांना मुख्यमंत्री म्हणून पाहू इच्छित आहे. फक्त मी नव्हे, तुमकुरूचे लोक देखील त्यांना मुख्यमंत्री म्हणून पाहू इच्छित आहे.

एका मत्र्यांना याविषयी मुख्यमंत्रि‍पदाबाबत विचारलं की, 'शिवकुमार यांना काय व्हायचं, हे त्यांच्या भाग्यावर अवलंबून आहे. वर्तवणूक ही भाग्यापेक्षा महत्वपूर्ण बाब आहे'.

कर्नाटकात मुख्यमंत्री बदलण्याची चर्चा सुरू आहे?

काँग्रेस आमदार इकबाल हुसैन यांनी डीके शिवकुमार ६ जानेवारी रोजी मुख्यमंत्री होतील, असा दावा केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

कर्नाटकाचे मुख्यमंत्री कोण आहेत?

आता सिद्धारमैया हे कर्नाटकाचे मुख्यमंत्री आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 20 : बिग बॉसमध्ये मोठा ट्विस्ट! अचानक बाजी पलटली, 'या' स्पर्धकाचा पत्ता कट

Morning Walk Benefits: रोज सकाळी काही मिनिटं मारा फेरफटका, होतील 6 आश्चर्यकारक बदल

Maharashtra News Live Update: येत्या तीन वर्षांत वन खात्यात २५ ते ३० हजार लोकांची भरती होणार!

Gokul Election : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान! सत्तेचा फैसला कोणाच्या बाजूने?

Maharashtra Weather : दसऱ्यापूर्वी मुसळधार पावसाची शक्यता, सोलापूरसह १४ जिल्ह्यांना झोडपून काढणार, IMD चा येलो अलर्ट

SCROLL FOR NEXT