Karnataka Election News Saam TV
देश विदेश

Karnataka Election: भाजपचे चार ते पाच आमदार राष्ट्रवादीत प्रवेश करणार; बड्या नेत्याचा दावा

Karnataka Election News : कर्नाटक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस कमीत कमी ४० जागा लढणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्नाटक प्रदेशाध्यक्ष हरी आर यांनी दिली.

साम टिव्ही ब्युरो

Karnataka Election News: कर्नाटक विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे. कर्नाटक विधानसभा काबिज करण्यासाठी अनेक राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चबांधणी सुरू केली आहे. १० मे रोजी मतदान होणार असून १३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात भाजप आणि काँग्रेस हे दोन प्रमुख पक्ष आहेत. (Latest Marathi News)

मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेसने देखील कर्नाटक विधानसभा निवडणुकीत आपले उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती.

दरम्यान, कर्नाटक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस कमीत कमी ४० जागा लढणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्नाटक प्रदेशाध्यक्ष हरी आर यांनी दिली. इतकंच नाही तर, भाजपचे विद्यमान ४ ते ५ आमदार आमच्या संपर्कात आहे, कर्नाटक निवडणुकीपूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, असा खळबळजनक दावा सुद्धा त्यांनी केला आहे.

कर्नाटक विधानसभेपूर्वी राष्ट्रवादीला मोठा दिलासा

२०१८ साली झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने १४ जागांवर निवडणूक लढवली होती. दरम्यान, निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, राष्ट्रवादीला घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवण्यास निवडणूक आयोगाने परवानगी दिली आहे. (Breaking Marathi News)

त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. निवडणूक आयोगाला पक्षाकडून पत्र लिहिण्यात आले होते त्यानंतर निवडणूक आयोगानं हा निर्णय घेतला आहे.

राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गेल्यानंतर राष्ट्रवादी आता कोणत्या चिन्हावर निवडणूक लढणार याकडं सर्वांचं लक्ष लागलेलं होतं. मात्र, निवडणूक आयोगाने दिलेल्या या निर्णयामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला आहे. (Maharashtra Political News)

कर्नाटक निवडणुकीसाठी काँग्रेसची तिसरी यादी जाहीर

काँग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. यामधून उत्तर कर्नाटकातील भाजपाचे माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांना अथनीमधून तिकीट दिले आहे. सवदी यांनी भाजपाने तिकीट न दिल्याने नाराज होऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

काँग्रेसने आज तिसरी यादी जाहीर केली. यामध्ये ४३ मतदारसंघात उमेदवार जाहीर करण्यात आलेत. १२४ उमेदवारांची यादी काँग्रेसने २५ मार्चला जारी केली होती. यानंतर ४२ उमेदवारांची यादी ६ एप्रिलला जारी करण्यात आली होती.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंना मोठा धक्का;चंद्रकांत पाटील विजयाच्या वाटेवर

Maharashtra Assembly Election Result: महाराष्ट्रात भाजपच्या याशामागे आहेत २ सूत्रधार, अमित शहांनी दिली होती मोठी जबाबदारी

पुन्हा येईन! भाजपच मोठा भाऊ, देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार का?

Pravin Darekar: महाराष्ट्राच्या जनतेची पुन्हा आम्हाला पसंती, प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया | Video

Protein Bar: प्रोटीन बार तुमच्या शरीरासाठी चांगले आहेत का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

SCROLL FOR NEXT