Stray Dog Issue update :  Saam tv
देश विदेश

Stray Dog Issue : मी २५०० भटक्या कुत्र्यांना मारून झाडाखाली गाडलं; आमदाराचा खळबळजनक दावा

Stray Dog Issue update : कर्नाटकातील आमदारने भटक्या कुत्र्यांबाबत धक्कादायक दावा केला आहे. मी २५०० भटक्या कुत्र्यांना मारून झाडाखाली गाडल्याचा दावा आमदाराने केला आहे.

Vishal Gangurde

भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावर सुप्रीम कोर्टाच्या निर्णय

आमदार भोजेगौडा यांनी २५०० कुत्र्यांना मारल्याचा खळबळजनक दावा

कर्नाटकमध्ये यावर्षी २.४ लाख लोकांना कुत्र्यांनी चावा घेतला जातो

मुख्यमंत्री सिद्धरमैया आणि राहुल गांधी यांची सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर टिप्पणी

भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. भटक्या कुत्र्यांबाबत सुप्रीम कोर्टाने घेतलेल्या निर्णयाने देशपातळीवर चर्चा सुरु झाली आहे. भटक्या कुत्र्यांच्या चर्चेदरम्यान कर्नाटकातील आमदाराने खळबळजनक दावा केला आहे. चिक्कमगलुरु नगर परिषदेचा अध्यक्ष असताना २५०० भटक्या कुत्र्यांना मारून झाडाखाली गाडलं. नैसर्गिक खते तयार होण्यासाठी निर्णय घेतल्याचे आमदारांनी सांगितलं. आमदार भोजेगौडा गेल्या अनेक वर्षांपासून विधान परिषद सदस्य आहेत.

कर्नाटकात या वर्षी २.४ लाख लोकांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला आहे. तर १९ जणांचा रेबीजमुळे मृत्यू झाला आहे. मंत्री रहीम खान यांनी म्हटलं की, आता भटक्या कुत्र्यांना लसीकरण आणि नसबंदी करण्याची परवानगी दिली. भोजेगौडा यांनी म्हटलं की, 'आता कोणत्याही रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांना आश्रयस्थानी पाठवण्याला विरोध करत असेल. त्यांच्या घरी १०-१० कुत्रे सोडून द्यायला हवे'.

कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरमैया यांनी म्हटलं की, 'भटक्या कुत्र्यांना धोकादायक मानून आश्रयस्थानात पाठवणे योग्य नाही. तर ही क्रूरता आहे'. सुप्रीम कोर्टाच्या दिल्ली-एनलीआरमधील भटक्या कुत्र्यांना आश्रयस्थानात पाठवण्याचे आदेश दिले आहेत. त्यावर मुख्यमंत्री सिद्धरमैया यांनी भाष्य केलं. सुप्रीम कोर्टाच्या म्हणण्यानुसार, भटक्या कुत्र्यांनी विशेष म्हणजे लहान मुलांना चावा घेतल्यानंतर त्यांना रेबीजचा धोका अधिक असतो'.

मुख्यमंत्री सिद्धरमैया यांनी राहुल गांधींच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, 'दिल्ली-एनसीआरमधील सर्व भटक्या कुत्र्यांना हटवण्याचा सुप्रीम कोर्टाचा आदेश हा दशकांपासून चालत आलेल्या मानवतावादी आणि विज्ञानाधिष्ठित धोरणाच्या एक पाऊल मागे आहे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Budh-Mangal Yuti: 18 महिन्यांनी होणार बुध-मंगळचा दुर्मिळ संयोग; 'या' राशींचं भाग्य उजळणार

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यात डेंगीचे 119 रूग्ण, मलेरियाचे 64 रूग्ण

Maiya Sanman Yojana: या राज्यातील महिलांना दर महिन्याला मिळतात ₹२५००; पैसे आले की नाही; असं करा चेक

Anant Chaturdashi 2025 live updates : निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी..., लाडक्या बाप्पाला आज निरोप

Jio Recharge Plan: ७५ रुपयांचा जिओचा प्रीपेड प्लॅन! २३ दिवसांची वैधता, अतिरिक्त डेटा मोफत अन् बरंच काही...

SCROLL FOR NEXT