Kapil Sibal Saam Tv
देश विदेश

Hijab Row: कर्नाटक उच्च न्यायालयातून हिजाब प्रकरण सर्वोच्च न्यायालयात घ्या, सिब्बलांच्या मागणीवर CJI म्हणाले...

सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण हस्तांतरित करून कलम २५ अन्वये सुनावणी घ्यावी आणि त्यात राज्याची भूमिका पाहावी अशी मागणी सिब्बल यांनी केली.

साम न्यूज नेटवर्क

दिल्ली : कर्नाटकचा हिजाब वाद (Karnataka Hijab row) आता सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) पोहोचला आहे. यासंबंधी ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांनी सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची मागणी केली आहे. सिब्बल (Kapil Sibal) म्हणाले कर्नाटकात (Karnataka) मुलींवर दगडफेक झाली. शाळा, महाविद्यालय बंद ठेवण्यात आली आहेत असंही सिब्बल यांनी सरन्यायाधीशांच्या (CJI) खंडपीठासमोर नमूद केले. सिब्बल यांनी हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी वर्ग करण्याची विनंती देखील केली.

हिजाबच्या वादावर कपिल सिब्बल सर्वोच्च न्यायालयात म्हणाले शाळा-कॉलेज बंद ठेवाव्या लागल्या, मुलींवर दगडफेकही झाली. हे धार्मिक प्रकरणासारखे आहे ज्याची सुनावणी नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाने केली होती. सबरीमाला मंदिर वादावर (Sabarimala temple dispute) सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाने सुनावणी केली हाेती असा दाखला देत सिब्बल यांनी हिजाबची सुनावणी सर्वाेच्च न्यायालयात घेण्यासाठी तातडीनं विचार करावा अशी मागणी केली.

दरम्यान सिब्बल यांच्या मागणीवर सरन्यायाधीशांनी (Chief Justice) आधी कर्नाटक उच्च न्यायालयाची (Karnataka High Court) सुनावणी पूर्ण होऊ द्या. उच्च न्यायालयाने ते मोठ्या खंडपीठाकडे वर्ग केले आहे. यावर सिब्बल यांनी या प्रकरणाची यादी करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयात करीत आहोत. सर्वोच्च न्यायालयाच्या कोणताही आदेश काढला नाही तर सर्वोच्च न्यायालयाने स्वत:कडे वर्ग करावा. सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण हस्तांतरित करून कलम २५ अन्वये सुनावणी घ्यावी आणि त्यात राज्याची भूमिका पाहावी अशी मागणी सिब्बल यांनी केली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care Tips: हे 'काळे पाणी' तुमच्या केसांच्या सर्व समस्या करतील मूळापासून दूर, एकदा नक्की ट्राय करुन पाहा

Mumbaicha Raja : 'मुंबईचा राजा...' म्हणू नका! रोहित शर्मानं चाहत्यांना रोखलं, VIDEO

Weight Gain : जेवणाच्या या चुकीच्या सवयींमुळे वाढेल वजन; वेळीच व्हा सावध

Sevai Kheer Recipe : सणासुदीला खास बनवा शेवयांची खीर, एक घास खाताच मन होईल तृप्त

Maharashtra Live News Update: पुण्यातील देविका हाइट्स इमारतीच्या टेरेसवरील टॉवर केबिनला आग

SCROLL FOR NEXT