Bodybuilder Sushil Kumar Death Saam Tv
देश विदेश

Famous Bodybuilder Death: प्रसिद्ध बॉडीबिल्डरचा २६ व्या वर्षी हार्ट अटॅकने मृत्यू, आईच्या डोळ्यांसमोर घेतला अखेरचा श्वास

Bodybuilder Sushil Kumar Death: कर्नाटकातील राष्ट्रीय स्तरावरील बॉडीबिल्डर सुशील कुमारचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. सुशीलचा मृत्यू आईच्या डोळ्यांसमोर झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

Shruti Vilas Kadam

Bodybuilder Sushil Kumar Death: कर्नाटकातील दावणगेरे येथून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. राष्ट्रीय स्तरावर नाव कमावलेला आणि अनेक पुरस्कारांनी सन्मानित 26 वर्षीय बॉडीबिल्डर सुशील कुमारचे हृदयविकाराच्या झटक्याने अचानक निधन झाले. त्यांच्या आकस्मिक मृत्यूमुळे क्रीडा क्षेत्रासह संपूर्ण दावणगेरे शहरात शोककळा पसरली आहे.

कुटुंबाच्या माहितीनुसार, सुशीलने नेहमीप्रमाणे सकाळी जिममध्ये व्यायाम केला होता. संध्याकाळीही तो पुन्हा प्रशिक्षणासाठी जाण्याच्या तयारीत होते. यावेळी तो दावणगेरे जिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या आपल्या आईला सोडण्यासाठी घराबाहेर पडला. मात्र, घरासमोरच त्यांना अचानक चक्कर आली आणि तो जमिनीवर कोसळले.

कुटुंबीयांनी आणि स्थानिकांनी तातडीने त्याला रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी केली असता त्यांचा रक्तदाब अत्यंत कमी झाल्याचे कळले. उपचार सुरू करण्याचे प्रयत्न करण्यात आले, मात्र त्यापूर्वीच त्याचे निधन झाले. या घटनेमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

सुशील कुमार याचे त्याच्या आईशी अतिशय जिव्हाळ्याचे नाते होते. त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर आईसोबतचे अनेक व्हिडिओ आणि फोटो पाहायला मिळतात. स्वतः रुग्णालयात सेवा देणाऱ्या आईला आपल्या तरुण मुलाचा शेवटचा श्वास डोळ्यांसमोर पाहावा लागल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सुशील कुमार हे के.टी.जे. नगर परिसरात राहत होता. त्याने अनेक राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील बॉडीबिल्डिंग स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली होती. त्याच्या मेहनतीमुळे आणि शिस्तबद्ध जीवनशैलीमुळे तो तरुणांसाठी प्रेरणास्थान मानले जात होते. मित्र आणि सहकाऱ्यांच्या मते, सुशील यांना कोणतेही व्यसन नव्हते. ते नियमित व्यायाम, योग्य आहार आणि शिस्तप्रिय जीवन जगायचा. त्यांनी अनेक तरुणांना फिटनेसचे धडे दिले होते आणि त्यांच्यात शिस्तीची जाणीव निर्माण केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Political News : आणखी एक पक्ष फुटणार, बड्या नेत्याच्या दाव्याने राजकारणात खळबळ

Gold Price Today: सोनं चांदीच्या दरात मोठी घसरण! 24k, 22k, 18k ची प्रति तोळा किंमत किती?

Maharashtra News Live Update: "जीव गेला तरी चालेल, पण माघार नाही!" – तुपकरांचा सरकारला इशारा

अहिल्यानगरमधील धक्कादायक प्रकार; तरुणीचा खून करून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न, प्रियकरासह वडील ताब्यात

Rakhi Sawant: 'काय हा प्रकार...'; राखी सावंतचा नवा रेड ड्रेस लूक पाहून नेटकरी हैरान, VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT