Karnataka Exit Poll 2023
Karnataka Exit Poll 2023 Saam TV
देश विदेश

Karnataka Exit Poll 2023 : कर्नाटकमध्ये अब की बार काँग्रेस सरकार? 5 पैकी 4 एग्जिट पोलमध्ये भाजप पिछाडीवर

Satish Kengar

Karnataka Exit Poll 2023 : कर्नाटकमध्ये विधानसभेच्या २२४ जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. आता १३ मे रोजी निकाल लागणार आहेत. कोणत्याही पक्षाला सरकार स्थापन करण्यासाठी ११३ जागांची गरज असते. दरम्यान, लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत. यावेळी कर्नाटकमध्ये कोण सरकार स्थापन करणार?

कर्नाटक विधानसभेवर कोणाचा झेंडा फडकणार? या प्रश्नांबाबत वेगवेगळ्या एक्झिट पोलचे निकाल समोर आले आहेत. यातून यावेळी कर्नाटकात कोणत्या पक्षाला किती जागा मिळतात, हे समजू शकते. ५ पैकी ४ एक्झिट पोलमध्ये काँग्रेस सर्वात मोठा पक्ष बनण्याचा अंदाज आहे. त्याचवेळी एका एक्झिट पोलमध्ये भाजपला बहुमत मिळताना दिसत आहे. (Latest Marathi News)

Jan Ki Baat Exit Poll : जन की बात एक्झिट पोल

भाजप - ९४ ते ११७ जागा

काँग्रेस - ९१ ते १०६ जागा

जेडीएस - १४ ते २४ जागा

इतर- ० ते २ जागा

Matrize opinion poll: मॅट्रिझे

भाजप - ७९ ते ९४ जागा

काँग्रेस - १०३ ते ११८ जागा

जेडीएस - २५ ते ३३ जागा

इतर - २ ते ५ जागा

PMARQ

भाजप - ८५ ते १०० जागा

काँग्रेस - ९४ ते १०८ जागा

जेडीएस - २४ ते ३२ जागा

इतर - २ ते ६ जागा

C Voter Exit Poll in Karnataka 2023 : सी - व्होटर

भाजप - ६६ ते ८६ जागा

काँग्रेस - ८१ ते १०१ जागा

जेडीएस - २० ते २७ जागा

इतर- ० ते ३ जागा

Polstrat Exit Poll in Karnataka 2023 : पोलस्ट्रॅट

भाजप - ८८ ते ९८ जागा

काँग्रेस - ९९ ते १०९ जागा

जेडीएस - २१ ते २६ जागा

इतर - ० ते ४ जागा

Karnataka Exit Poll 2023 : भाजपला ३८ वर्षांची परंपरा मोडायची आहे

कर्नाटकात सत्ताधारी भाजपला दर ५ वर्षांनी सत्ता बदलण्याची ३८ वर्षे जुनी परंपरा मोडून काढायची आहे, तर काँग्रेस यावेळी भाजपला सत्तेतून बाहेर करण्याचा दावा करत आहे. जेडीएसला आशा आहे की २०१८ प्रमाणेच पक्ष पुन्हा एकदा किंग मेकरच्या भूमिकेत येऊ शकतो. यावेळी निवडणुकीच्या प्रचारात सर्वच राजकीय पक्षांनी आपली पूर्ण ताकद लावली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Elgar Parishad Case: एल्गार परिषद प्रकरणात गौतम नवलखा यांना मोठा दिलासा, सर्वोच्च न्यायालयाने जामीन केला मंजूर

Special Report : नगरमध्ये पैशाचा पाऊस! लंकेंच्या व्हिडीओने राजकीय वर्तूळात खळबळ..

Today's Marathi News Live : होर्डिंगवर कारवाई करण्यास महापालिकेकडून सुरुवात

Bike Stunt Video : पुष्पाराज गाण्याचं तरुणाला वेड; थेट धावत्या बाईकवर झोपून स्टंटबाजी, VIDEO व्हायरल

PM Modi Roadshow in Mumbai : पीएम मोदी मुंबईत येणार; वाहतुकीत मोठे बदल, पर्यायी मार्ग

SCROLL FOR NEXT