Karnataka Elections 2023, PM Modi Road Show SAAM TV
देश विदेश

PM Modi Roadshow In Bengaluru : PM मोदींचा बेंगळुरूत दुसऱ्या दिवशीही ८ किमीपर्यंत मेगा रोड शो; 'मोदी-मोदी' जयघोष, VIDEO

Karnataka Elections 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी १० मे रोजी मतदान होत असून, रविवारी बेंगळुरूत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठ किलोमीटरपर्यंत मेगा रोड शो केला.

Nandkumar Joshi

Karnataka Elections 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी १० मे रोजी मतदान होत असून, रविवारी बेंगळुरूत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठ किलोमीटरपर्यंत मेगा रोड शो केला. रोड शो दरम्यान रस्त्यावर पंतप्रधान मोदींच्या समर्थकांची मोठी गर्दी उसळली. पंतप्रधानांनीही त्यांना अभिवादन केलं.

न्यू थिप्पसंद्र येथे केम्पेगौडा यांच्या पुतळ्यापासून टिनिट्री सर्कलपर्यंत पंतप्रधान मोदींचा रोड शो होता. तब्बल दीड तास हा रोड शो सुरू होता. सूत्रांच्या माहितीनुसार, रोड शो सुरू करण्यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी केम्पेगौडा यांच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण केली. हा रोड शो पूर्व आणि मध्य बेंगळुरूतील जवळपास सहा विधानसभा मतदारसंघातून काढण्यात आला. (Latest Marathi News)

रोड शोसाठी खास तयार केलेल्या वाहनात पंतप्रधान मोदींसह केंद्रीय राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर आणि खासदार पी. सी. मोहन हे देखील होते. रस्त्याच्या दुतर्फा मोदींचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली. पंतप्रधानांनीही त्यांचे अभिवादन स्वीकारले.

मोदी-मोदी, भारत माता की जयचा जयघोष

रोड शो दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या नागरिकांनी मोदी, मोदी...भारत माता की जय असा जयघोष केला. ढोलताशांचा आवाज घुमत होता. उत्साह टिपेला पोहोचला होता आणि समर्थकांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली. त्रिनिटी सर्कल येथे रोड शो समाप्त झाल्यानंतर पंतप्रधानांनी पुन्हा समर्थकांना अभिवादन केले.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी बेंगळुरूत रोड शो केला होता. बागलकोट जिल्ह्यातील बादामी आणि हावेरी या ठिकाणी प्रचारसभा घेऊन उपस्थितांना संबोधित केले. रोड शोच्या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि भाजपने विशेष तयारी केली होती. कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी १० मे रोजी मतदान होणार आहे. तर मतमोजणी १३ मे रोजी होईल. राज्यात सध्या भाजपचे सरकार असून, बसवराज बोम्मई हे मुख्यमंत्री आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Big Boss 19: बिग बॉसच्या घरात पुन्हा नवा ड्रामा,अभिषेक बजाज आणि अमाल मलिक यांच्यात पेटला वाद, Promo आला समोर

Bhiwandi Crime : भक्षकच! चिमुरडीचे शोषण केल्यानंतर अटक, २ महिन्यांपूर्वी कोर्टातून पळाला अन् पुन्हा अत्याचार करुन लहान मुलीला संपवलं

Maharashtra Live News Update: लातूरमध्ये तरुण शेतकऱ्याची आत्महत्या, अतिवृष्टीमुळे झाले मोठं नुकसान

Cyber Safety: ऑनलाइन फसवणूक झाल्यास तक्रार कशी आणि कुठे करावी? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप

वाढलेला रक्तदाब कमी करण्यासाठी 'या' मसाल्याचं पाणी करेल तुमची मदत

SCROLL FOR NEXT