Shruti Vilas Kadam
सकाळचा नाश्ता न केल्यास शरीराला आवश्यक एनर्जी मिळत नाही. त्यामुळे दिवसभर आळस, थकवा आणि कामात उत्साह कमी राहतो.
नाश्ता टाळल्याने मेंदूला पुरेसे ग्लुकोज मिळत नाही. यामुळे लक्ष केंद्रित करण्याची क्षमता आणि स्मरणशक्ती कमजोर होते.
नाश्ता न केल्याने पुढील जेवणात जास्त खाण्याची सवय लागते. त्यामुळे कॅलरीचे प्रमाण वाढून वजन वाढण्याची शक्यता अधिक असते.
रिकाम्या पोटी जास्त वेळ राहिल्याने अॅसिडिटी, गॅस, जळजळ आणि बद्धकोष्ठतेसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.
सकाळचा नाश्ता न केल्यास ब्लड शुगर लेव्हल अचानक वाढ-घट होऊ शकते. यामुळे मधुमेहाचा धोका वाढू शकतो.
नाश्ता न केल्याने हार्मोन्सचे संतुलन बिघडते. त्यामुळे चिडचिड, तणाव आणि मूड स्विंग्स जाणवू शकतात.
नियमित नाश्ता टाळणाऱ्यांमध्ये कोलेस्ट्रॉल वाढण्याची शक्यता असते. यामुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.