Karnataka Election Latest Update  Saam TV
देश विदेश

Karnataka Election 2023 : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांचा भाजपला रामराम, काँग्रेसमध्ये केला प्रवेश

Jagadish Shettar joins Congress : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांचा भाजपला रामराम

Satish Kengar

Karnataka Election Latest Update : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. भारतीय जनता पक्षाकडून तिकीट न मिळाल्याने नाराजी व्यक्त करत त्यांनी भाजप पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. भाजपने आपला अपमान केल्याचा आरोप त्यांनी केला. भाजपकडून जगदीश शेट्टर यांचे मन वळविण्याचे प्रयत्न झाले, मात्र त्यात त्यांना यश आलं नाही.

यादी अशी शक्यता वर्तवली जात होती की, ते अपक्ष म्हणून निवडणूक लढवतील. त्यांनी आपला राजीनामा उत्तरा कन्नड जिल्ह्यातील विधानसभा अध्यक्ष विश्वेश्वर हेगडे कागेरी यांच्याकडे सुपूर्द केला. विशेष म्हणजे 2023 च्या निवडणुकीत त्यांना उमेदवारी दिली जाणार नसल्याचे भाजप नेतृत्वाने स्पष्ट केले होते. मात्र पक्षाने त्यांना अन्य महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देऊ केल्याचे वृत्त आहे. (Latest Marathi News)

भाजपला 20 ते 25 जागांवावर याचा धक्का बसू शकतो

बंडखोरी भूमिका घेत शेट्टर म्हणाले की, त्यांना तिकीट नाकारल्यास राज्यातील किमान 20 ते 25 जागांवर परिणाम होईल. शेट्टर म्हणाले होते की, "पक्षाला त्याचा कोणताही नकारात्मक परिणाम होणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल." असं असलं तरी आता त्यांनी भाजप सोडत काँग्रेसचा हात धरला आहे.

माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनीही शेट्टर यांना तिकीट न मिळाल्यास केवळ एकाच प्रदेशावर परिणाम होणार नाही, तर उत्तर कर्नाटकातील अनेक मतदारसंघांवर त्याचा परिणाम होईल. याचा परिणाम किमान 20 ते 25 मतदारसंघांवर दिसेल असं ते म्हणाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

KamaltaI Gawai : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला जाणार का? सरन्यायाधीशांच्या मातोश्री कमलताई गवईंनी स्पष्टच सांगितलं

Avirat Patil: घे भरारी! इंजिनीअर झाला, पण पुण्याच्या FTII मध्ये गेला; जळगावच्या तरुणाच्या पहिल्याच लघुपटाला 'सुवर्ण कमळ'

म्हशीला झालं रानगव्यापासून रेडकू, दिसतंय सुद्धा रानगव्यासारखंच | VIDEO

Poha Chivada: संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी घरीच बनवा चटपटीत अन् कुरकुरीत पोहा चिवडा, रेसिपी एकदा वाचाच

Maharashtra Government : महाराष्ट्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय; राज्यातील दुकाने राहणार 24 तास खुली, कोणती दुकाने असतील बंद

SCROLL FOR NEXT