IPS Praveen Sood appointed as new CBI director
IPS Praveen Sood appointed as new CBI director Saam TV
देश विदेश

CBI New Director : भाजपची सत्ता जाताच केंद्राचा मोठा निर्णय, कर्नाटकच्या पोलीस महासंचालकांकडे सोपवली मोठी जबाबदारी

Satish Kengar

CBI New Director : कर्नाटकचे पोलीस महासंचालक प्रवीण सूद यांची सीबीआयच्या (सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन) संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते या पदावर दोन वर्षे काम करतील. 25 मे रोजी ते नवीन जबाबदारी स्वीकारू शकतात, कारण या दिवशी विद्यमान संचालक सुबोध कुमार जयस्वाल यांचा कार्यकाळ संपत आहे.

प्रवीण सूद यांच्या नावावर चर्चा करण्यासाठी उच्चस्तरीय बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांच्यासोबत विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरीही उपस्थित होते. यानंतर त्यांच्या नावाची निवड करण्यात आली आहे. चौधरी यांनी सूद यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेतल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

Who is Praveen Sood : कोण आहेत प्रवीण सूद?

प्रवीण सूद यांचा जन्म 1964 मध्ये हिमाचल प्रदेशमध्ये झाला. त्यांनी आयआयटी दिल्लीतून पदवी प्राप्त केली आहे. ते 1986 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असून सध्या कर्नाटकचे पोलीस महासंचालक आहेत. 1989 मध्ये ते म्हैसूरचे सहाय्यक पोलीस अधीक्षक झाले. यानंतर बेल्लारी आणि रायचूरचे पोलिस अधीक्षकही ते होते. त्यानंतर बेंगळुरूचे पोलीस उपायुक्त (DCP) म्हणून काम केले. (Latest Marathi News)

राष्ट्रपतींच्या हस्ते पोलीस पदक प्रदान

प्रवीण सूद हे 1999 मध्ये मॉरिशसमध्ये पोलिस सल्लागारही होते. 2004 ते 2007 पर्यंत ते म्हैसूर शहराचे पोलीस आयुक्त होते. त्यानंतर 2011 पर्यंत बेंगळुरू वाहतूक पोलिसांचे अतिरिक्त पोलिस आयुक्त म्हणून काम केले.

त्यांना 1996 मध्ये उत्कृष्ट सेवेसाठी मुख्यमंत्री सुवर्ण पदक, 2002 मध्ये पोलीस पदक आणि 2011 मध्ये विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान करण्यात आले.

दरम्यान, कर्नाटक काँग्रेसचे नेते डीके शिवकुमार यांची प्रवीण सूद यांच्यामध्ये वाद राहिला आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी सूद यांच्याबाबत ते या पदासाठी योग्य नसल्याचे म्हटले होते. सूद हे भाजपच्या बाजूने काम करत असल्याचा आरोपही शिवकुमार यांनी केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Rain News: विज पडल्याच्या आवाजाने घाबरुन ३ महिला पडल्या बेशुद्ध; एकीचा मृत्यू

Petrol Diesel Price : पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर; सामान्यांना मोठा दिलासा

Thane Crime News: धक्कादायक! मुंबईत धावत्या ट्रेनमध्ये मॉडेलवर अत्याचार; घटनेनंतर ३९ दिवसांनी गाठले पोलीस ठाणे

Gurucharn Singh Return Home : अखेर 'तारक मेहता...'फेम अभिनेता २५ दिवसांनी घरी परतला, गुरूचरण सिंह इतक्या दिवस कुठे होता?

Heat Wave Alert : दिल्लीकरांवर सूर्य कोपला, १४ वर्षांचा तापमानाचा रेकॉर्ड तुटला; ५ दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा

SCROLL FOR NEXT