karnataka News : गेल्या काही दिवसांपासून देशात महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. अनेक घटनांमध्ये ब्लॅकमेलिंग सारखे गंभीर गुन्हे असल्याचं समोर येत आहेत. अशीच एक घटना कर्नाटकात घडली आहे. येथील भारतीय क्रीडा प्राधिकरण केंद्रात शिकणाऱ्या तरुणीचा तिच्यासोबतच असणाऱ्या एका तरुणीने बाथरुममध्ये आंघोळ करतानाचा व्हिडीओ बनवला. (Latest Marathi News)
जेव्हा पीडित तरुणीने हा संपूर्ण प्रकार पाहिला तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली. तिने या व्हिडिओबद्दल तिच्या तरुणीला विचारलं असता, तिने उडवाउडवीची उत्तर देत तेथून पळ काढला. या घटनेची माहिती पीडितेने तातडीने केंद्राच्या अधिकाऱ्यांना दिली.
केंद्राच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ तरुणीला घेऊन पोलिसांत (Police) धाव घेतली. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी याप्रकरणी एफआयआर दाखल केला होता. आज आरोपी तरुणीला पोलिसांनी अटक केली आहे. त्याचबरोबर केंद्राने या तरुणीला निलंबित केले आहे.
या तरुणीवर तिच्या बॅचच्या आणखी एका तरुणीचा आंघोळ करतानाचा व्हिडिओ (Crime News) बनवल्याचा आरोप आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना २९ मार्चची आहे. पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया (SAI) बंगळुरू केंद्रात स्पोर्ट्स कोचिंगमध्ये डिप्लोमा करत आहे.
२९ मार्च रोजी नियमित सरावानंतर ती कॅम्पसमधील (Karnataka Crime) बाथरूममध्ये आंघोळ करण्यासाठी गेली होती. बाथरुमजवळ कुणी नसल्याचा फायदा घेत तिच्यासोबत असणाऱ्या एका तरुणीने खिडकीतून पीडित तरुणीचा अंघोळ करतानाचा व्हिडीओ बनवला.
खिडकीत होणाऱ्या हालचाली बघता, पीडितेने तातडीने कपडे घालून बाहेर येऊन बघितले असता, तिला तिची सहकारी तरुणी बाथरुमच्या खिडकीजवळ दिसली. या तरुणीने खिडकीवर आला मोबाईल ठेवला होता. दरम्यान, तरुणीने मोबाईल खिडकीत का ठेवला? अशी विचारणा केली असता, संशयित आरोपी तरुणीने उडवाउडवीची उत्तरे देऊन तेथून पळ काढला होता.
Edited By - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.