SHOCKING CHILD ABUSE CASE IN KARNATAKA TWO MINORS ASSAULTED VIDEOS VIRAL Saam Tv
देश विदेश

Shocking : संतापजनक! आई-वडिलांच्या मृत्यूनंतर २ मुलींना काकाने विकले, नराधमांनी वर्षभर बलात्कार केला, व्हिडिओ सोशल मीडियावर केले अपलोड

Karnataka Ramanagara Rape News : कर्नाटकातील रामनगर येथे दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार करून त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सायबर पोर्टलच्या सतर्कतेनंतर दोन आरोपींना अटक करण्यात आली असून तपास सुरू आहे.

Alisha Khedekar

  • रामनगर येथे अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराचा धक्कादायक प्रकार उघड

  • आरोपींनी अत्याचाराचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले

  • सायबर पोर्टलच्या सतर्कतेमुळे दोन आरोपी अटकेत

  • पीडित मुलींच्या काकांवर गंभीर आरोप; सध्या फरार

बंगळूरच्या रामनगर परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे. दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करून त्याचे चित्रीकरण करत ते व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. झटपट पैसे कमावण्याच्या लालसेपोटी हा अमानुष प्रकार करण्यात आल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. या घटनेने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल (NCRP) कडून मिळालेल्या सतर्कतेनंतर सायबर कमांड सेंटर (CCC) च्या गुप्तहेरांनी तात्काळ कारवाई केली. या कारवाईत कग्गलीपुरा जवळील कैदल्लिपल्या येथील २९ वर्षीय किरण कुमार नायक आणि चन्नपट्टणा येथील २० वर्षीय आदित्य एम. के. या दोघांना अटक करण्यात आली. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून तीन मोबाईल फोन जप्त केले असून त्यामध्ये अत्याचाराचे व्हिडिओ आढळून आले आहेत.

पीडित मुली ११ आणि १२ वर्षांच्या असून त्या एका शेतकरी कुटुंबातील आहेत. त्यांच्या आई आणि वडिलांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यानंतर त्या त्यांच्या काकांसोबत राहत होत्या. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, या काकांनी आरोपींकडून पैसे घेऊन मुलींना त्यांच्या ताब्यात दिले होते. गेल्या वर्षभरापासून या मुलींवर अत्याचार सुरू असल्याचे उघड झाले आहे. याबदल्यात पीडित मुलींच्या काकांना पैसे मिळत होते. दरम्यान पीडित मुलींचे काका सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

आरोपींनी मुलींवर लैंगिक अत्याचार करून त्याचे व्हिडिओ व्हायरल केल्यामुळे त्यांचा भंडाफोड झाला. या प्रकरणामुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे. सायबर कमांड सेंटरचे पोलीस महासंचालक प्रणब मोहंती यांनी सांगितले की, या घटनेचा सखोल तपास सुरू असून आरोपींविरोधात कठोर कारवाई केली जाईल. या प्रकरणी कग्गलीपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पीडित मुलींचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. फरार काकांचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

High Court: शपथ घेताना देवी-देवता, भारत माता, गुरूंचे नाव घेतले; भाजपच्या २० नगरसेवकांची शपथ हायकोर्टाकडून रद्द

Maharashtra News Live Update: MIDCतील प्रदुषणाचा फटका, काळ नदी पात्रातील मासे मेले

Maharashtra Politics: शिवसेनेत गेलेले 6 बंडखोर खासदार अपात्र होणार? ठाकरेंनी टाकला मोठा डाव

Pune Crime: पुणे हादरले! नवऱ्याकडून बायकोची हत्या, झोपेत असताना डोक्यात सिलिंडर टाकला

Cloudburst : गावे पाण्याखाली, हायवेवरील पूल वाहून गेला; अरुणाचल प्रदेशात ढगफुटीसदृश्य पावसाचा रुद्रावतार, VIDEO

SCROLL FOR NEXT