karnataka police AI
देश विदेश

कर्नाटकातील पोलीस पथक राजस्थानमध्ये लाच घेताना रंगेहाथ सापडलं; तिघांना घेतलं ताब्यात, काय आहे संपूर्ण प्रकरण?

Karnataka police news update: कर्नाटक पोलिसांच्या पथकाला राजस्थान पोलिसांनी बेड्या ठोकल्या. जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Vishal Gangurde

राजस्थानमधून धक्कादायक प्रकार उघडकीस

कर्नाटकातील पोलिसांना राजस्थानमध्ये अटक

कर्नाटकातील पोलिसांना अटक केल्याने पोलिसांच्या वर्तुळात खळबळ

राजस्थानमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. हुंड्यासाठी छळ प्रकरणात तपासासाठी राजस्थानला पोहोचलेल्या कर्नाटक पोलीस पथकातील तीन कर्मचारी लाच घेताना रंगेहाथ सापडले. राजस्थान पोलिसांनी बेंगळुरूच्या पोलीस उपनिरीक्षकांसहित ३ पोलीस कर्मचाऱ्यांना ४० हजारांची लाच घेताना अटक करण्यात आली आहे. या कारवाईनंतर पोलिसांच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे.

बेंगळुरूच्या एचएएल पोलीस स्टेशनच्या हद्दीतील हुंड्यासाठी छळ प्रकरणाचा तपास करण्यासाठी पीएसआय अनिता, शिपाई यतीश कुमार आणि उलवप्पा हे जयपूरला पोहोचले. आरोपींनी तपासादरम्यान आरोपीला अटक करण्याऐवजी दिलासा आणि मदत करण्याच्या नावाखाली लाच मागितली.

कर्नाटक पोलीस कर्मचाऱ्यांनी दोन लाखांची लाच मागितली होती. कारवाईतून दिलासा मिळवण्यासाठी कर्नाटकाच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी लाच स्वरुपात रोख रक्कम मागितली. लाच मागितल्याने पीडित व्यक्तीने राजस्थान पोलिसांकडे मदत मागितली. त्यानंतर त्याची तक्रार नोंदवण्यात आली.

तक्रार मिळाल्यानंतर राजस्थान पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. त्यानंतर लाच घेणाऱ्या पोलिसांना रंगेहाथ पकडलं. ४० हजारांची रक्कम स्वीकारताना एसीबीच्या पथकाने कर्नाटकातील पोलीस कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतलं.

राजस्थानच्या लाचलुचपत प्रतिबंधकाचे उपमहानिरीक्षक ओम प्रकाश यांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त पोलीस अधीक्षक भूपेंद्र चौधरी यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. कर्नाटकच्या पोलीस कर्मचाऱ्यांना अटक केल्यानंतर त्यांची चौकशी सुरू करण्यात आली. एसीबी अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, तिन्ही आरोपींविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. या तिन्ही पोलिसांवर काय कारवाई होणार, हे अद्याप स्पष्ट झालं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT