Karnataka CM; बसवराज बोम्मई राज्याचे नवे बनले मुख्यमंत्री  Saam Tv
देश विदेश

Karnataka CM; बसवराज बोम्मई राज्याचे नवे बनले मुख्यमंत्री

बीएस येडियुरप्पा यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर बसवराज बोम्मई आता कर्नाटकचे नवीन मुख्यमंत्री झाले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कर्नाटक : बीएस येडियुरप्पा BS Yeddyurappa यांनी कर्नाटकच्या Karnataka मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर बसवराज बोम्मई Basavaraj Bommai आता कर्नाटकचे नवीन मुख्यमंत्री CM झाले आहेत. आज ११ वाजता बोम्माई यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. बसवराज बोम्मई हे लिंगायत समाजातील ताकदवान नेते आणि येडियुरप्पा यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात.

पहा व्हिडिओ-

बसवराज बोम्मई हे मंत्रिमंडळाचे अध्यक्ष असणार आहेत. कोरोनासह अन्य बाबींवर ते अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. कर्नाटक मध्ये मुख्यमंत्री येडीयुराप्पांच्या राजीनाम्याने मोठी खळबळ माजलेली होती. येडीयुराप्पांचा उत्तराधिकारी कोण नेमायचा यावरून भाजप मध्ये पेच निर्माण झाला होता. लिंगायत समाजाला दुखवायचे नाही, एवढा संदेश भाजप नेतृत्वाकडे गेला होता. आज भाजपने कर्नाटकच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा केली आहे.

बोम्मई हे येडीयुराप्पा सरकारमध्ये गृहमंत्री पदी होते. बसवराज बोमाई यांच्यासह मंत्री मुरगेश निरानी, उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी आणि बसवंगौड़ा पाटील यतनाल त्याचबरोबर केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांची नावे चर्चेत होती. माझ्या मर्जीतला नेताच मुख्यमंत्री करावा अशी अट येडीयुराप्पा यांनी दिल्ली मध्ये घातली होती. यानुसार भाजपाने सुवर्णमध्य साधत बोम्मई यांना मुख्यमंत्री पद दिलेले आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी आज त्यांच्या मुख्यमंत्री पदाची घोषणा केली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ekvira Devi Temple: कोजागिरी पौर्णिमेनिमित्त एकविरा देवी मंदिराची फुलांनी सजावट

Royal Enfield Hunter 350 आणि Ronin कोणती बाईक आहे दमदार? जाणून घ्या फिचर्स अन् किंमती

Chandrashekhar Bawankule: मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची दुय्यम निबंधक कार्यालयात धाड; अधिकाऱ्याच्या ड्रॅावरमध्ये सापडले पैशांचे बंडल|VIDEO

Maharashtra Live News Update : - नंदुरबारच्या जिल्हा परिषद विद्यार्थ्यांचा मोठा दिलदारपणा

Mumbai To Grushneshwar: मुंबईहून घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग दर्शनासाठी प्रवास कसा करायचा? जाणून घ्या रेल्वे, बस आणि सर्वोत्तम पर्याय

SCROLL FOR NEXT