Cabinet Minister 
देश विदेश

Breaking : कॅबिनेट मंत्री सुधाकर यांचे निधन; फुफ्फुसाच्या संसर्गाशी झुंज ठरली अपयशी, राजकीय वर्तुळावर शोककळा

D Sudhakar passed away : कर्नाटकचे कॅबिनेट मंत्री डी. सुधाकर यांचे फुफ्फुसाच्या गंभीर संसर्गामुळे निधन झाले. बंगळुरूतील रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Namdeo Kumbhar

कर्नाटकच्या राजकीय वर्तुळातून अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. कॅबिनेट मंत्री (Cabinet Minister) डी. सुधाकर यांचे आज निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून सुधाकर हे फुफ्फुसाच्या गंभीर संसर्गाशी (Lung Infection) झुंज देत होते. त्यांच्या निधनामुळे कर्नाटक राजकारणात मोठी शोककळा पसरली आहे. डी. सुधाकर यांच्या निधनावर अनेक दिग्गज नेत्यांनी श्रद्धांजली (Condolences) वाहिली आहे.

कर्नाटक सरकारमधील नियोजन आणि सांख्यिकी मंत्री (Planning and Statistics Minister) डी. सुधाकर यांचे आज पहाटे ३:१५ च्या सुमारास निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून ते फुफ्फुसाच्या गंभीर संसर्गाशी (Severe Lung Infection) झुंज देत होते. बंगळुरू येथील कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (KIMS Hospital) मध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. पण उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे कर्नाटकच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

डी. सुधाकर हे कर्नाटक काँग्रेसचे ज्येष्ठ आणि निष्ठावान नेते मानले जात होते. ते चित्रदुर्ग जिल्ह्यातील हिरियूर विधानसभा (Hiriyur Assembly Constituency) मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. यापूर्वी त्यांनी सामाजिक कल्याण (Social Welfare) आणि युवा कल्याण यांसारख्या महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी सांभाळली होती. त्यांच्या साध्या राहणीमानामुळे आणि जनतेशी असलेल्या थेट संपर्कामुळे ते 'जमिनीवरचे नेते' म्हणून राज्यात ओळखले जात होते.

सुधाकर यांच्या निधनानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. "सुधाकर हे माझे जवळचे सहकारी होते, त्यांच्या निधनाने पक्षाचे आणि राज्याचे मोठे नुकसान झाले आहे," अशा भावना शिवकुमार यांनी व्यक्त केल्या. यासोबतच काँग्रेसचे वरिष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांनीही त्यांना श्रद्धांजली (Condolences) वाहिली आहे. सुधाकर निधनामुळे संपूर्ण राज्यात शोककळा (State of Mourning) पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

FIFA World Cup 2026 : ४८ संघ, १६ शहरं आणि १०४ सामने...कोण ठरणार विश्वविजेता? चक्रावून टाकणारा अंदाज

Thalapathy Vijay Family Photo: तमिळनाडूचे मुख्यमंत्री थलापती विजय यांच्या कुटुंबात कोण कोण आहे? जाणून घ्या त्यांच्या परिवाराविषयी

Maharashtra News Live Update: तामिळनाडूच्या राजकारणात थलपती पर्वाची सुरुवात

Cancer Risk: उशिरा गर्भधारणा केल्याने वाढतो 'या' कॅन्सरचा धोका, डॉक्टरांनी सांगितली लक्षणं अन् उपाय

Vijay Thalapathy : थलपती विजय यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ; मंत्री मंडळात कोण कोण?

SCROLL FOR NEXT