Karnataka BJP MLA SAAM TV
देश विदेश

Karnataka BJP MLA: भाजप आमदार निवडणुकीच्या तोंडावर 'आपटला'; लाचखोरीच्या आरोपानंतर राजीनामा देऊन झाला फरार

Karnataka BJP MLA: पोलिसांनी सांगितले की खरी मागणी 81 लाख रुपयांची होती. त्यातील 40 लाख रुपये त्या व्यक्तीने दिले होते.

Chandrakant Jagtap

Karnataka BJP MLA: कर्नाटकातील आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षाला लाचेच्या आरोपाला सामोरे जावे लागले आहे. गुरुवारी संध्याकाळी येथील एका आमदार पुत्राला वडिलांच्या कार्यालयात 40 लाख रुपयांची लाच घेताना पोलिसांनी रंगेहात पकडले. लोकायुक्त पोलिसांनी गुप्त माहितीवरून ही कारवाई केली. या कारवाईदरम्यान आरोपीच्या घरातून तब्बल 6.10 कोटी रुपयांची बेहिशेबी रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.

बंगळुरू पाणी पुरवठा आणि मलनिस्सारण मंडळात (BWSSB) मुख्य लेखापाल म्हणून काम करणाऱ्या व्ही प्रशांत मादल यांना त्यांचे वडील आणि चन्नागिरीचे भाजप आमदार के मादल विरुपक्षप्पा यांच्या क्रिसेंट रोड कार्यालयात एका खाजगी व्यक्तीकडून पैसे स्विकारल्यानतंर लोकायुक्त पोलिसांनी अटक केली आहे.

इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार लाच मागितलेल्या व्यक्तीने गुरुवारी सकाळी प्रशांत विरोधात एफआयआर दाखल केला. लोकायुक्त पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रशांतचे वडील कर्नाटक सोप्स अँड डिटर्जंट्स लिमिटेडचे (KSDL) चेअरमन आहेत आणि लाचेची रक्कम त्यांच्यासाठीच होती.

पोलिसांनी सांगितले की खरी मागणी 81 लाख रुपयांची होती. त्यातील 40 लाख रुपये त्या व्यक्तीने दिले होते. छाप्यांनंतर मदल विरुपक्षप्पा यांनी केएसडीएलच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे आणि सध्या ते फरार आहेत. (Latest Marathi News)

प्रशांतला ज्या कार्यालयातून पडले त्या कार्यालयातून 2.02 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. तसेच लोकायुक्त पोलिसांनी प्रशांतच्या डॉलर्स कॉलनी, संजयनगर येथील निवासस्थानीही भेट दिली. या ठिकाणाहून एकूण 6.10 कोटी रुपयांची बेहिशेबी रोकड जप्त करण्यात आली. (Latest Political News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

TCS Layoffs: TCSमध्ये 30 हजार नोकरकपात? आयटी कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीचं सावट

Nilesh Ghaywal : खाकीचा खुळखुळा, गँगस्टर पळाला; निलेश घायवळला पळवणारे पुणे पोलिसांमध्ये कोण? VIDEO

Black Pepper : दररोज काळीमिरी खाल्ल्याने आरोग्याला होतात 'हे' भन्नाट फायदे

Anil Deshmukh : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील हल्ला खोटा? अहवालात नेमकं काय?

Face Care Tips: ग्लोइंग त्वचेसाठी बेसन आणि हळदीचा पॅक लावताय? थांबा, होतील 'हे' दुष्परिणाम

SCROLL FOR NEXT