Karnataka Assembly Election Saam TV
देश विदेश

Karnataka Assembly Election: अपक्ष उमेदवाराने विरोधकांआधी सरकारी अधिकाऱ्यांनाच घाम फोडला, नेमकं काय झालं?

राज्यातील 224 सदस्यीय विधानसभेसाठी 10 मे रोजी मतदान होणार असून 13 मे रोजी मतमोजणी होणार आहे.

साम टिव्ही ब्युरो

Karnataka News: कर्नाटकात विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुका एकाच टप्प्यात होणार आहेत. राज्यातील 224 सदस्यीय विधानसभेसाठी 10 मे रोजी मतदान होणार असून 13 मे रोजी मतमोजणी होणार आहे.

अनेक पक्षांना निवडणुकीच्या दृष्टीने आपली तयारी सुरु केली आहे. पक्षांनी आपपल्या उमेदवारांच्या याद्याही जाहीर केल्या आहे. त्यामुळे उमेदवारांची अर्ज भरण्यासाठीही लगबग सुरु झाली आहे. यादगिरी विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार यंकप्पा यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला. (Political News)

निवडणूक आयोगाकडे डिपॉझिट भरण्यासाठी यंकप्पा यांनी नागरिकांकडून देणगी गोळा केली. गोळा केलेली दहा हजारांची रक्कम घेऊन ते आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पोहोचले. प्रत्येकी एक रुपयाची नाणी अशी 10,000 रुपयांची डिपॉझिट रक्कम जमा केली. (Latest Marathi News)

यकंप्पा यांनी जमा केलेली डिपॉझिट रक्कम मोजण्यासाठी यादगिरी कार्यालयातील अधिकाऱ्यांना जवळपास दोन तास लागले. यकंप्पा यांनी गळ्यात बॅनल घालत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी तहसीलदार कार्यालय गाठलं. या बॅनरवर समाजसुधारक बसवेश्वर, कर्नाटकातील संत-कवी कनकदास, स्वामी विवेकानंद, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो आणि राज्यघटनेची प्रस्तावना होती.

यावर असं लिहिलं होतं की, फक्त एक रुपया नाही, तुमचे एक मत द्या. तुम्ही मला मत द्या, मी तुम्हाला गरिबीतून मुक्त करीन. उमेदवार यंकप्पा हे कलबुर्गी जिल्ह्यातील गुलबर्गा विद्यापीठातून कला पदवीधर आहेत. त्यांच्याकडे एकूण 60,000 रुपयांची संपत्ती आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर

Gold Rate Today: दसऱ्याच्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण, १० तोळा ८,७०० रुपयांनी स्वस्त; वाचा 18k- 22k आणि 24k चे दर

भाजपवर कोसळला दु:खाचा डोंगर; बड्या नेत्याच्या निधनाने राजकारणात हळहळ

Gokul Election Result: गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत महायुतीला झटका, सतेज पाटील यांच्या एकाकी झुंजेला यश, वाचा विजयाची इनसाईड स्टोरी

Heart Blockage: लिंबू-आल्याचं पाणी प्यायल्याने हृदयाच्या रक्तवाहिन्यांमधील चरबी कमी होते? डॉक्टरांनी सांगितलं सर्जरीशिवाय कसे ठीक कराल ब्लॉकेज?

SCROLL FOR NEXT