Karnataka Accident Saam Tv
देश विदेश

Accident: भाविकांवर काळाचा घाला! ट्रक अन् कारची समोरासमोर धडक; ७ जणांचा जागीच मृत्यू

Karnataka Accident: कर्नाटकमध्ये भीषण रस्ते अपघात झाला. देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर काळाने घाला घातला. ट्रक आणि कारच्या धडकेत ७ जणांचा मृत्यू झाला.

Priya More
  • कर्नाटकातील महामार्गावर भीषण अपघात

  • ट्रक आणि कारची समोरासमोर धडक

  • अपघातामध्ये सात जणांचा जागीच मृत्यू

  • अपघातामध्ये दोन जण गंभीर जखमी

कर्नाटकमध्ये भीषण रस्ते अपघातामध्ये ७ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. कर्नाटकच्या उत्तर कन्नड जिल्ह्यामध्ये ही घटना घडली. मध्यरात्री भरधाव कार आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली. या अपघातामध्ये ७ जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामध्ये दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातानंतर महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येल्लापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील राष्ट्रीय महामार्ग- ५२ वरील अरबैल घाट परिसरात ही अपघाताची घटना घडली. मध्यरात्री १.३० वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातामध्ये सात जणांचा जागीच मृत्यू झाला तर २ जण गंभीर जखमी झाले. जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. हुबळी येथील केआयएमएस रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

कारमध्ये चालकासह ९ जण प्रवास करत होते. ही कार धारवाडवरून धर्मस्थळा आणि चिकमंगळूरच्या दिशेने जात होती. चालक अतिशय वेगाने आणि बेदरकारपणे कार चालवत होता. त्याचवेळी त्याची कार रस्त्याच्या दुसऱ्या मार्गिकेवर गेली. त्यावेळी अंकोलाहून येणाऱ्या ट्रकला कारने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भयंकर होती की कारचा चक्काचूर झाला. पोलिसांना कारमधून मृतदेह बाहेर काढणं देखील कठीण झाले होते.

अपघातामध्ये मृत्यू झालेले सर्वजण धारवाडचे रहिवासी होते आणि ते धर्मस्थळ आणि इतर ठिकाणी तीर्थयात्रेला गेले होते. कार चालक संजय अंगडी (३३ वर्षे), बसवराज (४८ वर्षे), अभिषेक ईश्वर (२८ वर्षे), अक्षय (२६ वर्षे), अभिषेक (२६ वर्षे) आणि मंजुनाथ चुलकी (३२ वर्षे) अशी मृतांची नावं आहेत. सर्वांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी जखमी तरुण शिवराजच्या तक्रारीच्या आधारे येल्लापूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: भाजपा किसान मोर्चाची प्रदेश कार्यकारिणी जाहीर

दुकान उघडताना शटरवर चावी का वाजवतात? कारण ऐकून थक्क व्हाल

आधी नोकरीचा राजीनामा दिला, नंतर डॉक्टरनं उचललं टोकाचे पाऊल; आरोग्य विभागात खळबळ

Mumbai Water : मुंबईकरांनो पाणी टंचाईची चिंता मिटली! महत्त्वाच्या ७ तलावांत ९३.८० टक्के पाणीसाठा

Raksha Bandhan 2026 : 27 की 28 ऑगस्ट रक्षाबंधन कधी? जाणून घ्या योग्य तारीख आणि मुहूर्त

SCROLL FOR NEXT