Boyfriend Girlfriend clash : Saam tv
देश विदेश

Boyfriend Girlfriend : दोघात तिसरा...! तरुणाच्या आयुष्यात दुसरी तरुणी आली, प्रेमात अडथळा ठरलेल्या गर्लफ्रेंडला संपवलं

Boyfriend Girlfriend clash : तरुणाच्या आयुष्यात दुसरी तरुणी आल्यानंतर त्याने गर्लफ्रेंडची हत्या केली. या हत्येच्या घटनेने खळबळ उडाली आहे.

Saam TV News

कानपूरमध्ये तरुणाने केली लिव्ह-इन पार्टनरची हत्या

हत्या केल्यानंतर गर्लफ्रेंडचा मृतदेह सुटकेसमध्ये नदीत फेकला.

आरोपीने दुसऱ्या मुलीसोबत संबंध सुरू केले, त्यामुळे भयंकर घटना घडली

कानपूरमध्ये खळबळजनक घटना घडली आहे. तरुणाने लिव्ह-इन पार्टनरची हत्या केल्याची घटना घडली आहे. तरुणाच्या आयुष्यात दुसरी तरुणी आल्यानंतर खळबळजनक पाऊल उचलल्याचं समोर आलं आहे. गर्लफ्रेंडची हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह सुटकेसमध्ये भरून नदीत फेकला. मृत तरुणीच्या आईने पोलिसांत तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा पर्दाफाश केला. या प्रकरणी पोलिसांनी हत्या करणारा बॉयफ्रेंड आणि त्याच्या मित्राला अटक केली. दोघांना रविवारी कोर्टात हजर केल्यानंतर तुरुंगात पाठण्यात येणार आहे.

पोलीस अधिकारी दीपेंद्र नाथ चौधरी यांनी सांगितलं की, 'कानपूर देहात रुराच्या सुजनीपूर गावातील विजयश्री यांनी ८ ऑगस्ट रोजी हनुमंत विहार पोलीस स्टेशनमध्ये मुलगी आकांक्षा हरवल्याची तक्रार दिली. आकांक्षा रेस्टोरेंटमध्ये काम करत असताना शिक्षणही घेत होती. आकांक्षाची सोशल मीडियावर एका तरुणासोबत मैत्री झाली. दोघांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमसंबंधात झालं. दोघेही रेस्टरेंटमध्ये काम करत होते. त्यानंतर दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले.

आकांक्षाची आई विजयक्षी यांनी सांगितलं की, दोन महिन्यापूर्वी आरोपीच्या बोलण्यावरून रेस्टोरंटमधील काम सोडून हमीरपूर रोडवरील एक रेस्टोरंटमध्ये नोकरी सुरु केली होती. पुढे आकांक्षा तिच्या मोठ्या बहिणीपासून वेगळी झाली. त्यानंतर दोघे हनुमंत विहार येथील भाड्याच्या घरात राहू लागले. काही दिवसांनी आकांक्षा बेपत्ता झाली. मुलगी आकांक्षा बेपत्ता झाल्यानंतर आईने पोलिसांत तक्रार दिली. हे प्रकरण पोलीस आयुक्तांकडे पोहोचल्यानंतर तपासाचा वेग वाढला.

काही दिवसांनी पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक केली. त्याने आकांक्षाची हत्या केल्याचं कबुल केलं. त्याचे अनेक मुलीसोबत प्रेमसंबंध होते. आकांक्षा आणि त्याचे व्हॉट्सअॅप चॅट देखील सापडले आहेत. रेस्टोरेंटमध्ये दोघांमध्ये भांडण झालं. त्यानंतर घरात गेल्यानंतरही दोघांमध्ये रात्री कडाक्याचं भांडण झालं. त्यानंतर आरोपीने घरात आकांक्षाची गळा दाबून हत्या केली. आकांक्षाची हत्या केल्यानंतर मित्राला घरी बोलावलं. त्यानंतर आकांक्षाचा मृतदेह सुटकेसमधून दुचाकीने नदीजवळ नेला. त्याने आकांक्षाचा मृतदेह नदीत फेकून दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Laxman Hake: आरक्षणाचा वाद वाढणार; SC मधून 'या' समाजालाही आरक्षण द्या; लक्ष्मण हाकेंची नवी मागणी

India vs Pakistan: फक्त एका चेंडूनंतर थांबवण्यात आला होता सामना; कारण आलं समोर

Sahibzada Farhan Gun Celebration: वाह दुबे जी वा! स्लोअर बॉलवर ढेर अन् म्हणे 'गन' सेलिब्रेशन|Video Viral

Bhadrapad Pola : बैलाची पूजा नव्हे, शेतकऱ्यांच्या कष्टाचा गौरव; पुण्यात भाद्रपद पोळा उत्साहात साजरा, VIDEO

Maharashtra Live News Update: दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर परभणी शहरासह जिल्ह्यात जोरदार पावसाची हजेरी

SCROLL FOR NEXT