देश विदेश

Kanpur Blast: रस्त्याच्या कडेला उभ्या बाईकमध्ये अचानक मोठा स्फोट, ८ जण गंभीर जखमी; नेमकं काय घडलं?

Kanpur Bike Explosion: कानपूरच्या मेस्तन रोडवर रस्त्याच्या कडेला उभ्या बाईकमध्ये अचानक स्फोट झाला. आठ जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलीस तपास करत असून स्फोटाचा नेमका कारण शोधण्यात येत आहे.

Dhanshri Shintre

बुधवारी उत्तर प्रदेशातील कानपूर शहरात मेस्टन रोडवर झालेल्या एका शक्तिशाली स्फोटामुळे परिसरात तीव्र घबराट पसरली. मिळालेल्या माहितीनुसार, रस्त्याच्या कडेला उभ्या दोन स्कूटरमध्ये अचानक स्फोट झाला. ज्यामध्ये आठ पेक्षा जास्त लोक जखमी झाले. यातील दोघांना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले. सहा जणांपैकी चार गंभीर भाजले आहेत, तर उर्वरित दोघे जखमींचे उपचार रुग्णालयात सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकारी, बॉम्ब पथके आणि फॉरेन्सिक टीम तात्काळ घटनास्थळी पोहोचली. पोलिसांनी सांगितले की स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यासाठी सविस्तर तपास सुरू आहे. या प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) आणि उत्तर प्रदेश एटीएस यांच्यात संपर्क साधला जात असून, स्फोटाच्या स्वरूपाबाबत विविध शक्यता तपासल्या जात आहेत. परिसरात दिवाळीपूर्वी बेकायदेशीरपणे फटाके साठवल्याची चर्चा असल्याने, फटाक्यांच्या स्फोटामुळे ही दुर्घटना झाली असावी, असा अंदाज वर्तवला जात आहे.

स्फोटाची तीव्रता इतकी होती की जवळच्या मरकज मशिदीच्या भिंतींना तडे गेले. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी सांगितले की स्फोटाचा आवाज सुमारे ५०० मीटर दूरपर्यंत ऐकू आला, ज्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आणि गोंधळ उडाला. सह पोलीस आयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) आशुतोष कुमार यांनी सांगितले की संध्याकाळी सुमारे ७:१५ वाजता हा स्फोट झाला. स्फोट झालेल्या स्कूटरची ओळख पटली असून, त्यांच्या चालकांची चौकशी करण्यात येणार आहे. त्यांनी स्पष्ट केले की ही घटना अपघात होती की कटाचा भाग, हे तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होईल.

कानपूरचे पोलिस आयुक्त रघुबीर लाल यांनी घटनास्थळी झालेल्या नुकसानीचा आढावा घेताना सांगितले की, दोन्ही स्कूटरच्या पुढील भागाचे नुकसान झाले आहे. तपासात फटाक्यांचा स्फोट होण्याची शक्यता अधिक असल्याचे दिसते. जर स्फोटकांचा वापर झाला असता तर नुकसान आणखी मोठे झाले असते आणि आजूबाजूच्या भिंतींना गंभीर इजा झाली असती.

सध्या यूपी एटीएस, बॉम्ब डिस्पोजल स्क्वॉड (बीडीएस) आणि फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (एफएसएल) टीम घटनास्थळी तपास करत आहे. पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे आणि नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून, तपास पूर्ण झाल्यानंतरच या स्फोटामागचे खरे कारण उघड होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Increasing arthritis: २०-४० वयोगटातील लोकांना संधिवाताचा धोका वाढला, 'या' एका कारणाने बळावतेय समस्या

Almond Benefits: दररोज सकाळी बदाम खाताना खाण्याचे ७ आरोग्यदायी फायदे

Politics : इंडिया आघाडीला दुहेरी धक्का, २ बड्या नेत्यांनी सोडली साथ; भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा

Maharashtra Live News Update: पुणे पोलिसांकडून घायवळ कुटुंबियांवर कारवाईचा बडगा

Viral Video : चालता चालता जमिनीवर कोसळले, पोलिस उपनिरीक्षकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू |CCTV

SCROLL FOR NEXT